Maharashtra Election: मी शरद पवारांना सोडलेलं नाही; विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांचं मोठं विधान
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election: मी शरद पवारांना सोडलेलं नाही; विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांचं मोठं विधान

Maharashtra Election: मी शरद पवारांना सोडलेलं नाही; विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांचं मोठं विधान

Nov 17, 2024 07:42 PM IST

Ajit Pawar On Sharad Pawar: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शरद पवारांबाबत मोठ वक्तव्य केले आहे.

मी शरद पवारांना सोडलेलं नाही; विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांचं मोठं
मी शरद पवारांना सोडलेलं नाही; विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांचं मोठं (PTI)

Ajit Pawar News: महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्य एका विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.मी शरद पवार यांना सोडलेले नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांणा उधाण आले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार आणि त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांच्यात लढत होणार आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी प्रतिष्ठेची लढत मानली जाते. यामुळे या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यासाठी आपपल्या पक्षाकडून जोरदार प्रचार केला जात आहे.

अजित पवार काय म्हणाले?

काहींना असे वाटत असेल की, मी शरद पवारांना सोडायला नको होते. मित्रांनो, मी साहेबांना सोडायले नाही. मी साहेबांना सांगितले होते की, आपण सरकारमध्ये जावे, हे माझे एकट्याचे मत नसून सर्व आमदारांचे मत होते. या ठिकाणी बसलेल्या संभाजी आणि राजवर्धन यांनाही विचारा. राज्य सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थिगिती मिळाली होती. लोक मला तर, वेढ्यात काढतील कारण पैसे पाठवले आणि स्थगिती दिली. आता ती स्थगिती मी नव्हती दिली. तेव्हा मी विरोधी पक्षनेता होतो. स्थगिती सरकारने दिली होती', असं अजित पवार यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी सर्व २८८ जागांसाठी मतमोजणी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी (काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट) आणि महायुती (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) यांच्यात मुख्य लढत आहे. २०२९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. तर, २०१४ मध्ये भाजपला १२२ जागा, शिवसेनेला ६३ आणि काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजुने कौल देणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर