Bangladeshi Arrested: बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवणाऱ्या चार बांग्लादेशी नागरिकांना मुंबईतून अटक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bangladeshi Arrested: बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवणाऱ्या चार बांग्लादेशी नागरिकांना मुंबईतून अटक

Bangladeshi Arrested: बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवणाऱ्या चार बांग्लादेशी नागरिकांना मुंबईतून अटक

Jun 11, 2024 06:14 PM IST

बनावट कागदपत्रांचा वापर करून भारतीय पासपोर्ट मिळवणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे.

ATS Arrested four people in fake passport case
ATS Arrested four people in fake passport case

बनावट कागदपत्रांचा वापर करून भारतीय पासपोर्ट मिळवणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (Aanti Terrorism Squad) अटक केली आहे. पोलिसांना खबऱ्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एटीएसच्या जुहू युनिटने नुकतीच ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रियाज हुसेन शेख (वय ३३), सुलतान सिद्धिया शेख (नय ५४), इब्राहिम शफिउल्ला शेख (वय ४४) आणि फारुख उस्मानी शेख (वय ३९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हे चौघेही मूळचे बांग्लादेशचे रहिवासी आहेत. हे सर्व आरोपी मुंबई शहराच्या विविध भागात राहत होते. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. भारतीय पासपोर्ट मिळवण्यासाठी आरोपींनी आपण गुजरातमधील सुरत येथील रहिवासी असल्याचे सांगितलं होतं. पासपोर्ट तयार करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

अटक करण्यात आलेल्यां व्यतिरिक्त आणखी पाच जणांनी अशाच प्रकारे पासपोर्ट मिळवल्याचे समोर आले आहे. त्यातील एक जण कामानिमित्त सौदी अरेबियाला गेला होता. या पासपोर्टच्या मदतीने काही जणांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदान केल्याचेही तपासात समोर आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून ते दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

आज या सर्व चार आरोपींना माझगाव येथील न्यायालयात आणण्यात आले. यापैकी न्यायालयाने तीन आरोपींना न्यायालयीन कोठडीत तर एका आरोपीला १४ जूनपर्यंत एटीएसच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे.

 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर