मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Palghar: नायलॉनच्या मांजामुळे आणखी एक दुर्घटना; कारच्या सनरूफमध्ये उभा असताना चिमुकल्याचा गळा चिरला

Palghar: नायलॉनच्या मांजामुळे आणखी एक दुर्घटना; कारच्या सनरूफमध्ये उभा असताना चिमुकल्याचा गळा चिरला

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 25, 2023 10:45 AM IST

Nylon Manja: नायलॉनच्या मांजामुळे गळा चिरल्याने पालघरमध्ये आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस केली आहे.

Representative Image
Representative Image

Palghar: पालघरमध्ये कारच्या सनरूफमध्ये उभा असताना एका आठ वर्षाच्या मुलाचा नायलॉनच्या मांजामुळे गळा चिरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृत मुलगा त्याच्या कुटुंबीयांसोबत हमरापूर गाळतर येथे फिरायला गेले असता संध्याकाळी ही दुर्घटना घडली. नायलॉनच्या मांजामुळे मृत्यू झाल्याची पालघर जिल्ह्यातील पाचवी घटना आहे. राज्यात बंदी असतानाही नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. या मांजामुळे पक्षांसह अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.

दिशान तिवारी असे नायलॉनच्या मांजामुळे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून तो मुंबईतील कांदिवली येथील रहिवाशी आहे. दिशान त्याचे आई-वडील, आजी-आजोबा आणि बहिणीसोबत हमरापूर गाळतरे येथे फिरायला गेला होता. दरम्यान, हिरवागार डोंगर आणि शेतीच दृश्य बघण्यासाठी दिशान कारच्या सनरूफमध्ये उभा राहिला. परंतु, अचानक नायलॉनचा मांजा त्याच्या गळ्यात अडकल्याने त्याला मोठी जखम झाली. त्याला ताबडतोब नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, गळ्याची नस कापल्यामुळे त्याची प्रकृती खालवत गेली. पुढील उपचारासाठी त्याला मुंबईला घेऊन जात असताना त्याने रस्त्यातच जीव सोडला.

नागपूर: नायलॉन मांजामुळे ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

नागपूरात वर्षाचा पहिला सण मक्रर संक्रातीच्या दिवशी नायलॉनच्या मांजामुळे गळा चिरून वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.नागपूर येथील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. वेद साहू असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. जानेवारी महिन्यात नॉयलॉनच्या मांजामुळे अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, कित्येकजण जखमी झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

WhatsApp channel