मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navi Mumbai: नववीत शाळा सोडली, युट्यूबवर पाहून नोटा छापायचं शिकला, 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात!

Navi Mumbai: नववीत शाळा सोडली, युट्यूबवर पाहून नोटा छापायचं शिकला, 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात!

May 17, 2024 03:53 PM IST

Navi Mumbai Fake Currency Notes News: घरातच बनावट नोटा छापल्याप्रकरणी नवी मुंबईतील तरुणाला पोलिसांनी अटक केली.

युट्यूबवर व्हिडिओ पाहून बनावट नोटा छापणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली.
युट्यूबवर व्हिडिओ पाहून बनावट नोटा छापणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली.

Navi Mumbai News: इयत्ता नववीत शाळा सोडलेल्या २६ वर्षीय तरुणाने युट्यूबवर पाहून बनावट नोटा छापून पैसे कमावले. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली. आरोपीने बनावट नोटा तयार करण्यासाठी फोटोकॉपी मशीन, कॉटन पेपर, कटर, स्पार्कल सेलो टेप आणि लोखंडी बॉक्सचा वापर केला. याबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या केंद्रीय युनिटच्या अधिकाऱ्यांनी तरुणाच्या घरावर छापा टाकला आणि २.०३ लाखांच्या नोटा जप्त केल्या.

ट्रेंडिंग न्यूज

प्रफुल्ल गोविंद पाटील असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा तळोजा परिसरातील तोंडरे गावातील रहिवाशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या जवळच्या बनावट नोटा १० हजारांना विकल्या. पकडले जाऊ नये म्हणून त्याने १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या कमी किमतीच्या बनावट नोटा बनवल्या, असे सेंट्रल युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील शिंदे यांनी सांगितले.

युट्यूबवर व्हिडिओ पाहून नोटा छापायचा शिकला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे बनावट नोटा बाजारात पोहोचवण्यासाठी कोणतेही मोठे सिंडिकेट किंवा एजंट नव्हते आणि जे लोक त्याला ओळखत होते, त्यांनीच त्याच्याकडून नोटा खरेदी केल्या होत्या. खरेदीदार कोण होते आणि त्यांनी खरेदी केलेल्या बनावट नोटांचे काय केले? हे जाणून घेण्यासाठी पोलीस तपास करीत आहे.पोलिसांनी ५० रुपयांच्या ५७४ नोटा, १०० रुपयांच्या ३३ नोटा आणि २०० रुपयांच्या ८५६ नोटा जप्त केल्या आहेत.

बनावट नोटा ओळखणे सर्वसामान्यांसाठी अवघड

आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून या बनावट नोटा छापत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. दिल्लीतील अशाच आणखी एका प्रकरणाविषयी वाचल्यानंतर त्याला हे करण्याची कल्पना सुचली, ज्यात एका व्यक्तीने साध्या सेटअपचा वापर करून बनावट नोटा छापल्या.बनावट नोटा कशा तयार केल्या जातील, हे समजून घेण्यासाठी त्याने युट्यूबवर व्हिडिओ पाहिले आणि आवश्यक साहित्य खरेदी केले. बनावट नोट ओळखणे सर्वसामान्यांना अवघड आहे, परंतु जर एखाद्याने ती काळजीपूर्वक पाहिली तर ती सहज ओळखली जाते. परंतु सहसा, कोणीही कमी मूल्याच्या नोटा तपासत नाही.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग