maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Updated May 19, 2024 11:02 AM IST

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावा लागत आहे. आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात गेल्या ७४ दिवसांत २४१ जण उष्माघाताचे बळी ठरले.
महाराष्ट्रात गेल्या ७४ दिवसांत २४१ जण उष्माघाताचे बळी ठरले.

Heat Wave in Maharashtra: महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेने उच्चांक गाठला आहे. त्याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या अडीच महिन्यांत दररोज सरासरी ३ जण उष्माघाताचे बळी ठरले. यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आली असून पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांतील लोक उन्हाच्या कडाक्याने त्रस्त झाले. यावर्षी १ मार्च ते १४ मे पर्यंत म्हणजेच गेल्या ७४ दिवसांत २४१ जण उष्माघाताचे बळी ठरले.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा

आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आल आहे. याशिवाय उष्मघाताच्या रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्यासाठी प्रोटोकॉलची जाणीव करून देण्यात आली.

राज्यांत अनेक भागात उष्णता कायम

रुग्णालयात योग्य उपचार मिळाल्याने कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. पुढील १५ ते २० दिवस लोकांना उन्हापासून आणि उष्णतेपासून वाचवावे लागणार आहे. जूनमध्ये मान्सून सुरू झाल्याने दिलासा मिळेल. मुंबईसह राज्यातील अनेक भागात अजूनही तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे.

जालन्यात सर्वाधिक मृत्युची नोंद

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार जालन्यात उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. जालन्यात आतापर्यंत २८ जण उष्माघाताचे बळी ठरले आहेत. त्यानंतर नाशिक- २७, बुलढाणा- २१, धुळे- २०, सोलापूर- १८ आणि नागपूरमध्ये ११ जण उष्माघाताचे बळी ठरले आहेत.

मुंबईत अद्याप उष्माघाताचा एकही रुग्ण नाही

एमएमआरमध्ये उष्माघाताची प्रकरणे आढळून आली आहेत, परंतु मुंबईत अद्याप उष्माघाताचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, मुंबईला लागून असलेल्या ठाण्यात उष्माघाताचे दोन, रायगडमध्ये दोन आणि पालघरमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे.

उष्माघाताची लक्षणे

उन्हात किंवा कडक उन्हात काम केल्यावर चक्कर येत असेल किंवा मळमळ होत असेल तर ही उष्माघाताची लक्षणे आहेत. अशा परिस्थितीत औषध घेण्याबरोबरच विश्रांती घ्यावी. ताप कितीही वाढला तरी पाण्याचे सेवन कमी होऊ देऊ नका.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर