मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  HSC Result 2024 Live : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी!

HSC Result 2024 Live : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी!

May 21, 2024 11:43 AM IST

MSBSHSE 12th Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थी दुपारी १ वाजता निकाल तपासू शकतात.

महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला.
महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला.

How to check Maharashtra 12th results: विद्यार्थी आणि पालकांना दुपारी एक वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येईल. विद्यार्थ्यांना mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज
  • यावेळीही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. या परीक्षेत ९२.६० टक्के मुले आणि ९५.४९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या.
  •  सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.५१ %) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (९१.९५ %) आहे.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. 
  • इयत्ता बारावीच्या परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
  • या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७०३२ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६९८६ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६५८१ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ९४.२० आहे.
  • या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,३३,३७१ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,२३,९७० विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,२९,६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकालाची टक्केवारी ९३.३७ आहे.
  • विज्ञान शाखेतून सर्वाधिक ७ लाख ६० हजार ०४६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. तर, कला आणि वाणिज्य शाखेतून अनुक्रमे ३ लाख ८१ हजार ९८२ आणि ३ लाख २९ हजार ९०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी महाराष्ट्र बारावीच्या परीक्षेत, कोकण जिल्ह्यात सर्वाधिक उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.०१ टक्के होते.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली, ज्यात एकूण ८ लाख २१ हजार ४५० मुले आणि ६ लाख ९२ हजार ४२४ मुलींचा समावेश होता.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी त्यांचे गुण महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in. वर तपासू शकतात.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग