मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtr News 30 September 2022 Live Updates Marathi Breaking News

Live Blog

Marathi News 30 September Live: शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांवर भाजपचा डोळा; राष्ट्रवादीचा दा

Marathi News Live Updates: ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजीवाडा, कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ या मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे, त्यासाठी भाजप एकनाथ शिंदेंवर दबाव टाकत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

Fri, 30 Sep 202210:20 AM IST

NCP: शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांवर भाजपचा डोळा; राष्ट्रवादीचा दावा

ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजीवाडा, कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ या मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे, त्यासाठी भाजप एकनाथ शिंदेंवर दबाव टाकत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. ओवळा माजीवाडा मतदारसंघ बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांचा आहे, मात्र हा आणि इतर दोन मतदारसंघ भाजपला हवे असून त्यादृष्टीने भाजप रणनीती आखत असल्याचे महेश तपासे म्हणाले.

Fri, 30 Sep 202209:49 AM IST

PM Modi in Gujarat: रुग्णवाहिकेला वाट करून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी थांबवला आपला ताफा

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून आज त्यांनी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि अहमदाबाद मेट्रोची सफरही केली. याच दौऱ्याच्या दरम्यान गांधीनगरहून अहमदाबादला जात असताना एका रुग्णवाहिकेला वाट करून देण्यासाठी पंतप्रधानांनी आपला ताफा थांबवला. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Fri, 30 Sep 202207:51 AM IST

Sumati Wankhede: ज्येष्ठ लेखिका, कवयित्री सुमती वानखेडे यांचं निधन

नागपूर: ज्येष्ठ कवयित्री, लेखिका सुमती वानखेडे यांचे आज, शुक्रवारी सकाळी निधन झाले. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील रुग्णालयात कर्करोगावर उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर वर्धा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

<p>Sumati Wankhede</p>
Sumati Wankhede

Fri, 30 Sep 202207:47 AM IST

Stock Market Update: सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजी

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागला असून आज सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजार पुन्हा सावरला आहे. सेन्सेक्स ९०० अंकांनी वधारला असून निफ्टीही तब्बल २५० अंकांहून अधिकने वाढून ट्रेड करत आहे.

Fri, 30 Sep 202206:05 AM IST

Shiv Sena: बीकेसीमध्ये शिंदे गटाचा नव्हे भाजपचा मेळावा होणार; राष्ट्रवादी काँग्रेसचा टोला

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात भारतीय जनता पक्ष स्वत:चे लोक भरणार आहे आणि ते लपवण्याकरता शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार असल्याचं भाजपचे नेते सांगत आहेत. खरंतर बीकेसीवर शिंदे गटाचा नव्हे, भाजपचा दसरा मेळावा होणार आहे, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केला आहे.

Fri, 30 Sep 202204:16 AM IST

Supriya Sule: सरकारला मेळावे आणि दौऱ्यांमधून वेळच मिळत नाही - सुप्रिया सुळे 

राज्यातील सरकारच्या मुख्यमंत्र्यांना व मंत्र्यांना दिल्ली दौरे आणि मेळाव्यांतून वेळच मिळत नाही. त्यामुळं सर्वसामान्यांची कामच होत नाहीत. घोषणा वगळता या सरकारनं काय केलयं हे आम्हाला दाखवून द्या, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली.

Fri, 30 Sep 202204:05 AM IST

Stock Market News: सेन्सेक्सची घसरगुंडी सुरूच

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेली पडझड आजही कायम राहील असं चित्र आहे. आज सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्स घसरला आहे तर निफ्टीही ५० अंकांनी खाली येऊन ट्रेड करत आहे.

Fri, 30 Sep 202203:22 AM IST

RBI चे पतधोरण आज जाहीर होणार, रेपो रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण बैठकीनंतर आज निर्णय जाहीर केले जाणार आहेत. यामध्ये आरबीआय पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. व्याज दर ०.५० टक्के वाढवले जाऊ शकतात. महागाई नियंत्रित करण्यासाठी मे महिन्यापासून आतापर्यंत आरबीआयने रेपो रेटमध्ये १.४० टक्के इतकी वाढ केली आहे.

Fri, 30 Sep 202203:08 AM IST

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेचा केरळमधून कर्नाटकमध्ये प्रवेश, ५३२ किमी अंतर पूर्ण

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेने केरळमधून कर्नाटकात प्रवेश केला आहे. आतापर्यंत ५३२ किमी अंतर पार केले असून ३ हजार ३८ किमी अंतर अद्याप बाकी आहे.

Fri, 30 Sep 202202:19 AM IST

Maharashtra Rain: राज्यातील काही भागात येत्या तीन दिवसात पावसाची शक्यता

राज्यात येत्या तीन ते चार दिवसात काही भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. तर विदर्भात २ ऑक्टोबरनंतर पाऊस पडेल असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

Fri, 30 Sep 202202:17 AM IST

शिंदे-फडणवीस सरकारने केल्या राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ठाणे पालिकेच्या आय़ुक्तपदी अभिजीत बांगर, तर नवी मुंबईच्या आय़ुक्तपदी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय म्हैसकर दाम्पत्य, प्रवीण दराडे, तुकाराम मुंढे यांच्याही बदल्या झाल्या.