Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा आज ठाणे दौरा; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात शक्तीप्रदर्शन
Uddhav Thackeray Visit Thane Today: शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आज प्रथमच मुख्यंमत्री शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात पाय ठेवणार आहेत.
Maharashta politics: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज ठाणे दौरा करणार आहेत. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जाणार आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे ठाण्यातील तलाव पाळी परिसरात वैद्यकीय शिबीराला भेट देतील. त्यानंतर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आनंद आश्रमात जाणार आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
आनंद दिघे यांची २७ जानेवारी रोजी जयंती आहे. यानिमित्ताने २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ठाकरे गटाच्यावतीने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. ठाण्यातील जांभळीनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात हे शिबीर होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
उद्धव ठाकरे ठाण्यात दौऱ्यात आज दुपारी १२ वाजता महाआरोग्य शिबिरात जाणार आहे. त्यानंतर दुपारी १२.५० मिनिटांनी ते टेंभी नाक्यावरच्या आनंद आश्रमाला भेट देणार आहेत. दुपारी १.१५ वाजता उद्धव ठाकरे चरई जैन मंदिरात जाणार आहेत. दुपारी १.४५ ते २.३० पर्यंतची वेळ राखून ठेवण्यात आली आहे. यानंतर दुपारी ३ वाजता उद्धव ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना होतील.
ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ठाण्यात जिल्ह्यात शिवसेनेला पहिला सत्ता मिळाली. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या महापालिकांसह नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये आजवर शिवसेनेचा दबदबा पाहायला मिळालाय. आनंद दिघेच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याची कमान हाती घेतली. ठाणे जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी खूप महेनत घेतली. यामुळेच बंडखोरीनंतर त्यांना ठाणे जिल्ह्यातून मोठे समर्थन मिळाले.