Maharashra weather update : राज्यात पावसाचा जोर ओसरला! आज पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर 'या' जिल्ह्यांना IMD चा यलो अलर्ट-maharashra weather update rain is still heavy on the coast and ghatmatha today imd alert ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashra weather update : राज्यात पावसाचा जोर ओसरला! आज पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर 'या' जिल्ह्यांना IMD चा यलो अलर्ट

Maharashra weather update : राज्यात पावसाचा जोर ओसरला! आज पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर 'या' जिल्ह्यांना IMD चा यलो अलर्ट

Aug 05, 2024 06:42 AM IST

Maharashtra weather update : राज्यात पुढील काही दिवसांत पावसाचा जोर ओसरणार आहे. कोकणातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर मध्य महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर विदर्भ, मराठवाडा, खांदेश येथील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात पावसाचा जोर ओसरला! आज पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर 'या' जिल्ह्यांना IMD चा यलो अलर्ट
राज्यात पावसाचा जोर ओसरला! आज पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर 'या' जिल्ह्यांना IMD चा यलो अलर्ट (Hindustan Times)

Maharashtra weather update : राज्यात शनिवारी व रविवारी झालेल्या पावसामुळे पुरस्थिती उद्भवली होती. पुण्यात धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणे तुडुंब भरल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला होता. दरम्यान, आज राज्यातील बहुतांश भागातील पावसाचा जोर हा ओसरला आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पालघर, ठाणे, मुंबईला सुद्धा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक, कोल्हापूर तर विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार उत्तर झारखंड व लगतच्या भागावर असलेले अती तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आज ईशान्य मध्य प्रदेश व लगतच्या दक्षिण उत्तर प्रदेशावर आहे. त्याची तीव्रता पुढील १२ तासात कमी होण्याची शक्यता आहे. दक्षिण राजस्थान व नगरच्या पाकिस्तानवर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता नैऋत्य राजस्थान व लगतच्या दक्षिण पाकिस्तानवर आहे. समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पत्ता दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टी लगत सक्रिय आहे. या हवामानविषयक प्रणालीचा परिणाम म्हणून आज राज्याच्या किनारपट्टीवर मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे. तर पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरात देखील तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणात आज व रायगडला काही ठिकाणी जोरदार त्यातील जोरदार तर तुरळ ठिकाणी अत्यंत जोरदार म्हणजे २०० मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. ठाणे, मुंबई, रत्नागिरी मध्ये काही ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. कोकणात आज तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे कोकणातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

मध्य महाराष्ट्रात नाशिक पुणे व सातारा या जिल्ह्यांच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार म्हणजे २०० मीमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मैदानी भागात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तिथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आज कोल्हापूर व उद्या पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा व तुरळक ठिकाणी वादळी वाढत पाऊस पडण्याची शक्यता शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भात सहा ते आठ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

पुणे व परिसरात ५ ऑगस्ट रोजी आकाश संपूर्ण ढगाळ राहून संततधार, मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. पुण्याच्या घाट विभागात जोरदार चे अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने त्या ठिकाणी देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.