Mahaparinirvan Din : मुंबईकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा पुढील ३ दिवसांच्या वाहतुकीमधील बदल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahaparinirvan Din : मुंबईकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा पुढील ३ दिवसांच्या वाहतुकीमधील बदल

Mahaparinirvan Din : मुंबईकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा पुढील ३ दिवसांच्या वाहतुकीमधील बदल

Dec 03, 2024 05:54 PM IST

Mahaparinirvan Din 2024 : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दादर परिसरात लाखोंची गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहतूक नियमावली जाहीर करून काही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले आहेत.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील वाहतुकीत बदल
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील वाहतुकीत बदल

Mahaparinirvandin 2024 traffic advisory :‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी परिसरात लाखोंची गर्दी होत असते. ही गर्दी लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. बुधवार ते शुक्रवार या तीन दिवसांसाठी हा बदल असेल.

५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ०६.०० वाजल्यापासून ७ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत चैत्यभुमी, शिवाजीपार्क दादर परिसराकडे जाणाऱ्या खालील रस्त्यावरील वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करणेकरीता काही मार्गावरील वाहतूकीमध्ये बदल करण्यात येत आहेत.

कायआहेत वाहतुकीतीलबदल?

एक दिशा मार्ग व वाहतुकीसाठी बंद रस्ते -

१ - स्वातंत्रवीर सावरकर मार्ग हा श्री सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून हिंदूजा हॉस्पिटल पर्यंत वाहतुकीकरीता बंद राहिल. तथापी हिंदूजा हॉस्पिटल येथील स्थानिक नागरिक हे एस. बँक जंक्शन येथे डावे वळण घेवून पांडूरंग नाईक मार्ग राजावडे चौक येथे जावू शकतील.

२ -एस. के. बोले रोड उत्तर वाहिनी श्री. सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगिज चर्च जंक्शन पर्यंतएक दिशा मार्ग राहिल म्हणजेच सदर मार्गाच्या दक्षिण वाहिनीवरून पोर्तुगिज चर्च जंक्शन येथून श्रीसिध्दीविनायक मंदिर जंक्शनकडे सर्व वाहनांना प्रदेश बंद राहिल.

३. संपूर्ण रानडे रोड हा सर्व प्रकारच्या वाहतुकीकरीता बंद राहिल

४. ज्ञानेश्वर मंदिर रोड हा सर्व प्रकारच्या वाहतुकीकरीता बंद राहिल

५ - जांभेकर महाराज रोह हा सर्व प्रकारच्या वाहतुकीकरीता बंद राहिल.

६ संपुर्ण केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर हा वाहतुकीकरीता बंद राहिल.

७ -सेपुर्ण एम. बी. राऊत मार्ग हा वाहतुकीकरीता बंद राहिल.

८ टी. एच. कटारीया मार्ग हा एल. जे. रोडच्या शोभा हॉटेल जंक्शन ते आसावरी जंक्शन पर्यंत वाहतुकीस बंद राहिल.

९ सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना खालील मार्गावर प्रतिबंध करण्यात येत आहे.

अ) स्वातंत्रवीर सावरकर मार्गाच्या माहिम जंक्शन ते हर्डीकर जंक्शन पर्यंत,

ब) एल. जे. रोडव्या माहिम जंक्शन ते गडकरी जंक्शन पर्यंत,

क) गोखले रोडच्या गडकरी जंक्शन ते धवमिल नाका पर्यंत,

ड) सेनापती बापट मार्गाच्या माहिम रेल्वे स्थानक ते वडाचा नाका पर्यंत,

इ) दादर टी.टी. सर्कल ते टिळक ब्रिजवर,वीर कोतवाल गार्डन ते संपुर्ण एन. सी. केळकर रोड पर्यंत.

चैत्यभूमीकडे जाणाऱ्या शिवाजीपार्क परिसरातील खालील रस्ते नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे

 

१ - संपुर्ण स्वातंत्रवीर सावरकर मार्ग,

२ संपुर्ण ज्ञानेश्वर मंदिर रोड.

३संपुर्ण जांभेकर महाराज रोड.

४ संपुर्ण रानडे रोड

५ -संपुर्ण केळुस्कार रोड दक्षिण आणि उत्तर.

६ -संपुर्ण एम. बी. राऊत रोड.

७ -संपुर्ण पांडूरंग नाईक मार्ग.

८-संपुर्ण एन. सी. केळकर रोड,

९- डॉ. वसंतराव जे. राय मार्ग हर स्वातंत्रवीर सावरकर मार्ग ते अमेगो हॉटेल पर्यत

१० एस. एच. परळकर मार्ग हा स्वातंत्रवीर सावरकर मार्ग.

११ डी. एस. बाबरेकर मार्ग हा सुर्यवंशी हॉल जंक्शन से व्हिजन प्रोस्ट मिलीग पर्यंत.

१२ किर्ती कॉलेज लेन मार्ग हा किर्ती कोलेसिमल ने मिरामार सोसायटी पर्यंत.

१३ काशीनाथ धुरु रोड हा काशीनाथ शुरु जंक्शन से आगार बाजार सर्कल पर्यंत.

१४ एल. जे. रोड व शोभा हॉटेल ते गडकरी जंक्शन पर्यंत.

१५ कटारीया मार्ग हा माहिर जंक्शन शोभा होटेल ते आसावरी जंक्शन पर्यंत.

१६ राजगृह परिसराच्या बाजूचा हिंदु कोलनी रोड नं. ०१ ते रोड नं. ०५ पर्यंत

१७ लखमशी क्यु रोड हा शुभम हॉटेल ते सईया कॉलेज,दहकर मैदान पर्यंत

१८ खरेघाट रोड नं. ०१ ते पाटकर गुरुजी चौक पर्यंत

१९ लेडी जहांगिर रोड हा सईया जंक्शन ते पाच गार्डन ते सैन्ट सेरोक स्कूल पर्यंत.

२० आर. ए. मिलबाई रोक हा अरोरा जंक्शन लिज्जत पापड जंक्शनपर्यंत

Whats_app_banner

संबंधित बातम्या