महामानवाला अभिवादन! चैत्यभूमीवर उसळला भीमसागर, राज्यपालांसह नवनियुक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महामानवाला अभिवादन! चैत्यभूमीवर उसळला भीमसागर, राज्यपालांसह नवनियुक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

महामानवाला अभिवादन! चैत्यभूमीवर उसळला भीमसागर, राज्यपालांसह नवनियुक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

Dec 06, 2024 08:49 AM IST

Mahaparinirvan Din 2024 : महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे. सकाळपासून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायांनी महामानवाला अभिवादन केले.

महामानवाला अभिवादन! चैत्यभूमीवर उसळला भीमसागर, राज्यपालांसह नवनियुक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली
महामानवाला अभिवादन! चैत्यभूमीवर उसळला भीमसागर, राज्यपालांसह नवनियुक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

Mahaparinirvan Din 2024 : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज ६८ वी पुण्यतिथी असून या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे आले आहे. बुधवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. या अभिवादन कार्यक्रमासाठी मुंबई पालिकेने चोख व्यवस्था केली आहे. तर पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवला आहे.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी देखील चैत्यभूमी येथे येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना आदरांजली वाहिली. आज दिवसभर अनेक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. त्यांचं ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झालं. हा दिवस भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. दादर येथील समाधीस्थळ चैत्यभूमी येथे गेल्या दोन दिवसांनपासून लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी आले आहे. चैत्यभूमी येथे स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मध्यरात्रीपासून अनुयायांच्या रांगा लागल्या आहेत.

महापालिकेतर्फे विविध सुविधा

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी येणाऱ्यांसाठी मुंबई महापालिकेने विविध सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. दादर चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ यासह आवश्यक ठिकाणी अनुयायींची व्यवस्था करण्यात आली आहे. पाण्याची, फिरते स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात आले आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी ५३० नळ, ७० टॅंकर व स्नानगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सोबतच पाण्याच्या बाटल्या व बिस्किटेही येथे येणाऱ्यांना दिली जात आहे. मुख्य रस्ता, इंदू मील परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान याठिकाणी अतिरिक्त शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर