मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai CNG Price cut : निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत सीएनजीच्या दरात कपात; आजपासून नवे दर लागू

Mumbai CNG Price cut : निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत सीएनजीच्या दरात कपात; आजपासून नवे दर लागू

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 06, 2024 11:13 AM IST

CNG Price Cut in Mumbai: महानगर गॅस लिमिटेडनं (Mahanagar Gas) मुंबईतील सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २.५० रुपयांची कपात केली आहे.

Mahanagar Gas
Mahanagar Gas

CNG Price In Mumbai: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाहनचालकांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. महानगर गॅस लिमिटेडनं मुंबईतील सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २.५० रुपयांची कपात केली आहे. महानगर गॅस लिमिटेडनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत म माहिती दिली. महागनगर गॅस लिमिटेडनं सीएनजीच्या दर कपातीच्या घेतलेल्या निर्णयाचे मुंबईकरांकडून स्वागत करण्यात आले आहे.

मुंबई महानगर गॅसकडून नैसर्गिक वायूच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने गॅसदरात कपात करण्यात येत आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर सीएनजीवर चालणारी वाहने आहेत. दर कपातीमुळे या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महानगर गॅस लिमिटेडनं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २.५० रुपयांची कपात करण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांना आता एक किलो सीएनजीसाठी केवळ ७३.४० रुपये मोजावे लागतील.

महत्त्वाचे म्हणजे, मुंबई महानगर गॅसच्या सीएनजीचे दर पेट्रोलच्या तुलनेत ५३ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत २२ टक्क्यांनी कमी आहेत. सीएनजीच्या दरातील कपातीमुळे वाहतूक क्षेत्रातील नैसर्गिक वायूचा वापर वाढण्यास मदत होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंबईनंतर देशातील इतर भागातही सीएनजीच्या दरात कपात केली जाऊ शकते.

राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अपडेट करतात. मुंबईत मंगळवारी पेट्रोलचे दर १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ९४.२७ रुपये प्रति लिटरवर स्थिर होते. आगामी काळात निवडणुका देखील होणार आहेत. केंद्र सरकार इंधनाच्या किमती कपात करण्याचा निर्णय घेऊ शकते.

IPL_Entry_Point

विभाग