Mahadev Bet App Pune Police action : भारतासह परदेशात महादेव बेटिंग एप प्रकरणी तपास सुरू आहे. या प्रकरणाची पाळेमुळे पुण्यातील नारायणगाव इथंपर्यंत पोहोचल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत समोर आले आहे. आज ग्रामीण पोलिसांनी नारायणगाव येथे एका इमारतीवर छापेमारी केली असून या संपूर्ण इमारतीत महादेव बेटिंग एपचं काम सुरू असल्याचे उघड झाले आहे. या कारवाईत ७० ते ८० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
महादेव बेटींग ॲप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे एका इमारतीतून सुरू असलेल्या कारभारावर आज पोलीसांनी मोठी छापेमारी केली आहे. या कारवाईत ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तब्बो ७० ते ८० जणांना ताब्यात घेतले आहेत.
परदेशासह देशातील इतर राज्यातल्या छापेमारी नंतर महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपची कामे पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली होती. ही कामे नारायणगाव येथील एका बड्या इमारतीत सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून पथकाला मिळाली. त्यानुसार नारायणगाव पोलिसांनी छापेमारी केली. या करवाईत ७० ते ८० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी या इमारतीत छापा टाकला त्यावेळी अख्खी इमारतच महादेव एप संदर्भातील कामासाठी वापरली जात असल्याचे पुढे आले. ताब्यात घेण्यात आलेल्यांची चौकशी सुरू आहे. तपासात अनेक धक्कादायक माहीती पुढे येण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
बेटिंग ॲपवर सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बंदी घातली होती. आयटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी व मानी लॉड्रिंक प्रकरणी सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये महादेव बेटिंग ॲप व वेबसाइटवर बंदी घातली होती. या प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करत बॉलिवूड सेलिब्रिटी व राजकारण्यांची चौकशी केली आहे. तर अभिनेता साहिल खान याला नुकतीच अटक करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या