Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse MVA Protest Today : सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा संपूर्ण राज्यातून निषेध केला जात आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज महाविकास आघाडीतर्फे या घटनेचा निषेध करण्यासाठी सरकारला 'जोडे मारो आंदोलन' करण्यात येणार आहे. सर्व आंदोलन हुतात्मा चौकात जमले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले यांच्यासह अनेक नेतेमंडळी देखील येथे पोहोचली असून त्यांनी हुतात्मांना अभिवादन करून गेट वे ऑफ इंडियाकडे रवाना झाले आहेत. आंदोलक मोठ्या प्रमाणात घोषणा बाजी करत आहेत. यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमला आहे.
शिवद्रोही सरकारविरोधात आम्ही जोडे मारो आंदोलन करणार आहे. आंदोलनाला आंदोलनानं प्रत्युत्तर देणं हा भाजपचा मूर्खपणा असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राऊत म्हणाले, शिवाजी महाराजांच काळ असता तर तुमचा कडेलोट केला असता. आंदोलनादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी टीका केली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, शिवाजी महाराजांचा पुतळा हवेतून कसा पडला? राज्यात भ्रष्टाचारात गुंतलेले सरकार आहे. स्मारकाच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. राज्य सरकार त्यांच्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही.
मालवणमधला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महावीकस आघाडी आज गेट वे ऑफ इंडिया येथे जोडे मारो आंदोलन करणार आहे. मात्र, या आंदोलणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. असे असले तरी महाविकास आघाडीतील नेते आंदोलनावर ठाम आहेत.
महावीकस आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी सकाळी १० पासून बंद ठेवण्यात आला आहे. या आंदोलनाला हुतात्मा चौकातून सुरुवात होणार आहे. येथून गेटवे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. गेटवे ऑफ इंडियावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सरकारला जोडे मारो आंदोलन केले जाणार आहे.
आज महाविकास आघाडीतर्फे पुतळा कोसळल्या प्रकरणी सरकारचा निषेध केला जाणार आहे. या साठि आज आंदोलन केले जाणार आहे. आज सकाळी ११ वाजता महाविकास आघाडीतील सर्व नेते हुतात्मा चौकात जमणार आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मांना वंदन केले जाणार आहे.. यानंतर आंदोलक हे गेट ऑफ इंडियाच्या दिशेनं मोर्चा काढणार आहेत. गेट ऑफ इंडियावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून सरकारला जोडे मारो आंदोलन केले जाणार आहे.
नौदल दिन सिंधुदुर्ग येथील राजकोट येथे उभारण्यात आलेला पुतळा कोसळला. हा पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
परवानगीविना महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आज मुंबईत आंदोलन करत असल्याने मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिका-यांची बैठक पार पडली. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस सतर्क आहेत.