Maha TET 2024 : राज्यातील भावी शिक्षकांची रविवारी परीक्षा! फिंगरप्रिंट अन् चेहरा स्कॅन होणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maha TET 2024 : राज्यातील भावी शिक्षकांची रविवारी परीक्षा! फिंगरप्रिंट अन् चेहरा स्कॅन होणार

Maha TET 2024 : राज्यातील भावी शिक्षकांची रविवारी परीक्षा! फिंगरप्रिंट अन् चेहरा स्कॅन होणार

Nov 08, 2024 11:48 AM IST

Maha TET 2024 : राज्यात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत रविवारी जिलहानिहाय शिक्षक पात्रतेसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे.

राज्यातील भावी शिक्षकांची रविवारी परीक्षा! फिंगरप्रिंट अन् चेहरा स्कॅन होणार
राज्यातील भावी शिक्षकांची रविवारी परीक्षा! फिंगरप्रिंट अन् चेहरा स्कॅन होणार

Maha TET 2024 : राज्यात शिक्षक पात्रेतेसाठी अनिवार्य असलेली महाटेट परीक्षा रविवारी आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा राज्य शिक्षण परिषदेमार्फत घेतली जाणार आहे. सर्व केंद्रांवर तयारी पूर्ण करण्यात आली असून करण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत परीक्षेसंदर्भातील तयारी पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक परीक्षार्थी उमेदवारांची परीक्षा केंद्रांवर बायोमेट्रिक अन् चेहरा स्कॅन करण्यात येणार आहे. यंदा ही परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध व पारदर्शकपणे घेतली जाणार असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात टीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमदेवारांनी १० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत संबंधित प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे, असे शिक्षण विभागाने कळविले आहे. ऑफलाइन पद्धतीने होत असलेल्या टीईटी परीक्षेसंदर्भात शिक्षणाधिकारी कादर शेख हे विविध केंद्रप्रमुखांच्या बैठका आयोजन करून परीक्षेचे सर्व नियोजन केले आहे.

पुण्यात रविवारी (दि १०)पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर हद्दीतील विविध ३५ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. पहिला पेपर हा सकाळच्या सत्रात तर दुपारच्या सत्रात दूसरा पेपर होणार आहे. विविध २२ केंद्रांवर १० हजार ६१७ उमेदवार ही परीक्षा देणार आहे. तर दुपार सत्र (पेपर २) साठी विविध ३५ केंद्रांवर १६ हजार ३३१ उमेदवार प्रविष्ठ आहेत, यासाठी एकूण १० झोन करण्यात आलेले आहेत. वर्ग २ च्या अधिकाऱ्याऱ्यांची झोनल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.

सुचनांचे करावे लागणार कठोर पालन

परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांनी त्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रावरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. उमेदवारांनी परीक्षेस जाताना परीक्षा प्रवेशपत्र व इतर अधिकृत ओळखपत्र सोबत घेऊन जावे. याव्यतिरिक्त कोणताही कागद, मोबाईल, पेजर, कॅलक्युलेटर इत्यादी कोणतेही प्रकारचे लिखित अथवा डिजीटल साहित्य सोबत घेऊन जावू नये. तसेच परीक्षेच्या कालावधी दरम्यान कोणत्याही प्रकारच्या गैरमार्गाचा अवलंब करू नये,

२० मिनिटे आधी मिळणार प्रवेश

उमेदवारांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी २० मिनिटे आधी परीक्षागृहात प्रवेश देणेत येईल. व्यानतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षागृहात प्रवेश असणार नाही. सर्व उमेदवारांनी रहदारीचे नियोजन विचारात घेऊन परीक्षाकेंद्रावर वेळेल उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व परीक्षा सुरळीत अन् पारदर्शक पद्धतीने व्हावी व सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्येक परीक्षा केंद्रावर व परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासंदर्भातील तयारी अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत रविवारी (दि. १०) शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. पुण्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण तयारी होत आहे. परीक्षा सुरळीत व नियोजनबद्ध पार पाडावी यासाठी झोनल अधिकारी व केंद्रप्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर