RTO: खासगी वाहनांवर महाराष्ट्र शासन लिहिणाऱ्यांची आता खैर नाही, उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  RTO: खासगी वाहनांवर महाराष्ट्र शासन लिहिणाऱ्यांची आता खैर नाही, उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार!

RTO: खासगी वाहनांवर महाराष्ट्र शासन लिहिणाऱ्यांची आता खैर नाही, उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार!

Dec 28, 2024 09:18 AM IST

RTO Guidelines: खाजगी वाहनांवर महाराष्ट्र शासन लिहिणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इसारा आरटीओकडून देण्यात आला आहे.

खासगी वाहनांवर महाराष्ट्र शासन लिहिणाऱ्यांची आता खैर नाही
खासगी वाहनांवर महाराष्ट्र शासन लिहिणाऱ्यांची आता खैर नाही

RTO Warns Private Vehicles: खासगी वाहनांच्या बाहेर आणि आत 'महाराष्ट्र सरकार' असे लिहिण्यास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून त्याचा गैरवापर होत असल्याची तक्रार आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सांगण्यात आले. अशी वाहने रस्त्यावर आढळून आल्यास संबंधित कारचालकाविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आरटीओकडून देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे खासगी वाहनांवर 'महाराष्ट्र सरकार' अशा नावाचे स्टीकर मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. मात्र, अशा वाहनांवर मोटार वाहन कायदा आणि त्याखालील नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मोटार वाहन कायदा १९८४ नुसार सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनाही त्यांच्या खाजगी वाहनांवर महाराष्ट्र शासनाच्या नावाची पाटी लावण्यास सक्त मनाई आहे. मात्र, तरीही रस्त्यावर पोलीस, वकील, डॉक्टर, खासदार, आमदार, न्यायाधीश, महाराष्ट्र सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकारचे अशा नावाची पाटी असलेल्या गाड्या दररोज धावत असतात. कोणताही सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी त्याच्या वैयक्तिक वाहनावर ‘महाराष्ट्र सरकार’ नावाची पाटी लावू शकत नाही.

टोलमधून सुटका मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नावाचा वापर

पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी आणि टोलमधून सुटका मिळवण्यासाठी सरकारी कर्मचारी त्यांच्या वाहनांवर 'महाराष्ट्र सरकार' लिहितात. अशा वाहनांमागे गैरकृत्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासह जी वाहने सरकारी कामासाठी सरकारने भाडेतत्त्वावर घेतली होती. मात्र, आता त्यांचे करार संपले आहेत, अशा वाहनांवर आजही 'महाराष्ट्र सरकार' असे लिहिलेले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून परिवहन विभागाने महाराष्ट्र शासनाच्या मालकीची वाहने वगळून खासगी वाहनांच्या बाहेरील आणि आतील बाजूस 'महाराष्ट्र शासन' असे लिहिणे आणि नावाची पाटी लावण्यास बंदी घातली आहे. याबाबतचा अध्यादेशही जारी करण्यात आला आहे.

लवकरच राज्यभरात वाहनांची तपासणी मोहीम राबवली जाणार

राज्यात वाहनांवर ‘महाराष्ट्र सरकार’ आणि ‘पोलीस’ अशा अनधिकृत नावाची पाटी लावण्याचे प्रकार वाढले आहेत. तर, दुसरीकडे गुन्हेगारही अशा नावाच्या पाटीचा वापर करत असल्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून परिवहन विभागाकडून लवकरच अशा वाहनांची तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी वाहनधारकांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यामुळे ज्या खाजगी वाहनांवर महाराष्ट्र सरकार अशा नावाची पाटी आहे, त्यांनी ती काढून घ्यावी, असे आवाहन केले जाते.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर