Maha CET Exam schedule : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेचे (सीईटी) संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी (महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा) ९ ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत घेण्यात येणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सीईटी सेलतर्फे १९ परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते.
राज्य सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी (पीसीबी) गटासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा ९ ते १७ एप्रिल २०२५; तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स (पीसीएम) गटासाठी १९ ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत घेण्यात येणार आहे. डीपीएन-पीएचएन (डिप्लोमा इन सायकायट्रिक नर्सिंग अँड डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ नर्सिंग) साठी एमएचटी-सीईटी ७ आणि ८ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
बीबीए (बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन), बीबीएम (बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट), बीएमएस (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) आणि बीसीए (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स) साठी एमएचटी-सीईटी परीक्षा १ ते ३ एप्रिल २०२५ दरम्यान होणार आहे. बी डिझाइन (बॅचलर ऑफ डिझाइन) साठी प्रवेश परीक्षा २९ मार्च २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. तीन वर्षांच्या इंटिग्रेटेड एमएड (मास्टर ऑफ एज्युकेशन) आणि हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमासाठी एमएचटी-सीईटी २८ मार्च २०२५ रोजी होणार आहे.
फिजिकल एज्युकेशन पदवी अभ्यासक्रम आणि हॉटेल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी एमएचटी-सीईटी २७ मार्च २०२५ रोजी होणार आहे. बीएड/बॅचलर ऑफ एज्युकेशन (जनरल अँड स्पेशल) आणि बीएड एलसीटी (बॅचलर ऑफ एज्युकेशन इन टीचिंग इन टीचिंग टू अदर लँग्वेजेस) साठी एमएचटी-सीईटी २३ ते २५ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे.
एमसीए (मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स) साठी एमएचटी-सीईटी २३ मार्च २०२५ रोजी होणार आहे. कायद्याच्या तीन वर्षांच्या पदवीसाठी एमएचटी-सीईटी २० आणि २१ मार्च २०२५ रोजी होणार आहे. एमबीए (मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन) आणि एमएमएस (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) साठी एमएचटी-सीईटी १७ ते १९ मार्च २०२५ दरम्यान घेण्यात येणार आहे. शारीरिक शिक्षणातील पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदवीसाठी एमएचटी-सीईटी १६ मार्च २०२५ रोजी होणार आहे.