'राणूआक्का' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे हिचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, कारणही सांगितलं!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'राणूआक्का' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे हिचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, कारणही सांगितलं!

'राणूआक्का' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे हिचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, कारणही सांगितलं!

Published Oct 17, 2024 10:26 AM IST

Ashwini Mahangade Joins NCP-SP : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर टीव्ही अभिनेत्री अश्विनी महांगडे हिनं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

राणूआक्का फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे राजकारणाच्या आखाड्यात, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश
राणूआक्का फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे राजकारणाच्या आखाड्यात, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश

Ashwini Mahangade Joins NCP-SP : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' या टीव्ही मालिकेतील 'राणूआक्का' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे हिनं नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. अश्विनीनं शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

अश्विनीला घरातूनच राजकीय वारसा आहे. तिचे वडील शरद पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. लोकसभा निवडणुकीत अश्विनी महांगडे ही शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारातही दिसली होती. ती सामाजिक कार्यातही सक्रिय आहे. त्यामुळं ती राजकीय क्षेत्रात पदार्पण करेल अशी अपेक्षा होतीच. ती खरी ठरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत तिनं नुकतीच तिनं तुतारी हाती घेतली. पक्ष प्रवेशानंतर तिनं इन्स्टाग्रामवर सविस्तरही पोस्टही शेअर केली आहे.

अश्विनी महांगडे म्हणते…

माझे वडील स्व. प्रदीपकुमार महांगडे (नाना) यांनी कायम शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं. अगदी गावातल्या निवणुकांपासून ते लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात अगदी झोकून देवून ते काम करायचे. जेवायला बसल्यावर चर्चा सुद्धा त्याच. राजकारण हा त्यांचा आवडता विषय. लोकांच्या मदतीला धावून जाणं हे रक्तातच होतं त्याच्या. त्यांना कायम कार्यकर्ता बनून राहायला आवडायचं.

साधारण ४ वर्षांपूर्वी त्यांना जाणवलं की मी समाजासाठी काम करू शकते, त्यांच्यासाठी उभी राहू शकते आणि पक्षानं जबाबदारी दिली तर काम करण्याचा आवाका वाढेल. हे त्यांचं स्वप्न अर्थात ४ वर्षानंतर आज कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर पूर्ण झालं. ही नवीन जबाबदारी मला अजून घडवेल. समाजासाठी काम करायची जाणीव सतत करून देईल. स्वीकारलेलं काम जबाबदारीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. यात अनेक लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा होत्या म्हणून हे शक्य झाले. त्यांचे आभार.

महिला विभागाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी महाराष्ट्र अश्विनी महांगडे हिची पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याबद्दल अश्विनीनं शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांचे आभार मानले आहेत. अमोल दादा कोल्हे, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, मेहबूब शेख, प्रसाद काका सुर्वे, डॉ. नितीन सावंत, राजकुमार पाटील, बाबर, संतोष पवार यांनाही धन्यवाद दिले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या