Maharashtra Exam: एमएएच सीईटीकडून बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची वाट पाहणारे उमेदवार cetcell.mahacet.org येथील अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक पाहू शकतात. वेबसाइटवरील अधिकृत अधिसूचनेनुसार, दुसऱ्या टप्प्याच्या निकालाची संभाव्य तारीख २८ ऑगस्ट २०२४ आहे. त्यानंतर इच्छुक उमेदवारांना २९ ऑगस्ट २०२४ ते ६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
उमेदवार अधिकृत वेबसाइटवर संभाव्य वेळापत्रकानुसार ०९ सप्टेंबर २०२४ रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करण्याची अपेक्षा करू शकतात. १० ते १२ सप्टेंबर २०२४ या कालावधीत उमेदवारांना आपल्या तक्रारी सादर करता येणार असून अंतिम गुणवत्ता यादी १३ सप्टेंबर २०२४ जाही केली जाणार आहे. अधिकृत सूचनेनुसार, नमूद बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी संभाव्य वेळापत्रक जारी केले जात आहे.
कर्मचारी निवड आयोगाने एसएससी सीजीएल टियर १ परीक्षा २०२४ च्या तारखा (८ ऑगस्ट) जाहीर केल्या आहेत. कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन किंवा एसएससी सीजीएल २०२४ मध्ये बसणारे उमेदवार ssc.gov.in अधिकृत वेबसाइटवर नोटीस पाहू शकतात. नोटीसनुसार, एसएससी सीजीएल टियर १ परीक्षा २०२४ येत्या ९ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि २६ सप्टेंबर २०२४ रोजी संपेल.भरती मोहिमेच्या माध्यमातून एसएससीने अंदाजे १७ हजार ७२७ रिक्त जागा भरण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ऑनलाइन नोंदणी २४ जूनपासून सुरू झाली असून २७ जुलै २०२४ पर्यंत मुदत होती. आयोगाने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर वापरकर्ता विभागांकडून कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. परीक्षेत किमान पात्रता गुण अनारक्षित उमेदवारांसाठी ३० टक्के, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी २५ टक्के आणि इतर सर्व प्रवर्गांसाठी २० टक्के आहेत. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.