मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Inspirational Story: रस्ता अपघातात मुलीचा मृत्यू; नातेवाईकांनी तेराव्याला जेवण न ठेवता हेल्मेट वाटले
Madya Pradesh Road Accident
Madya Pradesh Road Accident

Inspirational Story: रस्ता अपघातात मुलीचा मृत्यू; नातेवाईकांनी तेराव्याला जेवण न ठेवता हेल्मेट वाटले

18 March 2023, 17:26 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Madhya Pradesh Accident: रस्ता अपघात मरण पावलेल्या मुलीच्या तेराव्याला नातेवाईकांनी जेवण न ठेवता हेल्मेट वाटून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला.

Road Accident: चारचाकी आसो किंवा दुचाकी, कोणतेही वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. याबाबत वारंवार सुचनाही वाहतूक पोलिसांकडून दिल्या जातात. न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दुचाकीस्वारच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट सक्तीचे केले आहे. मात्र, तरीही अनेकजण वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य प्रेदश येथे रस्ता अपघातात मुलीचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी तिच्या तेराव्याला जेवण न ठेवता हेल्मेट वाटून संपूर्ण गावासमोर आदर्श ठेवला.

ट्रेंडिंग न्यूज

मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील ग्राम झिरन्या येथे आपल्या भावासोबत बाईकवर बसून जाणाऱ्या मुलीच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला. या मुलीने हेल्मेट घातले असते तर, तिचा जीव नक्कीच वाचला असता, असा विश्वास नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आला. यामुळे तिच्या तेराव्याला जेवण न ठेवता हेल्मेट वाटण्याचा त्यांनी निर्णय घेऊन त्यांनी गावकऱ्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला.

अपघातात मरण पावलेली मुलीग अपंग होती. कुटुंबियांना आर्थिक हातभार लावण्यासाठी ती शिवणकाम करायची. परंतु, शिलाई मशीन बिघडल्याने ती दुरुस्त करण्यासाठी भावासोबत दुचाकीने खांडव्याला जात होती. मात्र, अभापुरी गावाजवळ वाहनासमोर अचानक जनावर आल्याने मुलीचा तोल गेला आणि ती जमनीवर पडली. ज्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला खांडव्याच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने तिला इंदूरच्या एमवाय रुग्णालयात हलवण्यात आले, तिथे उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला .मात्र, भविष्यात कोणत्याही व्यक्तीसोबत अशाप्रकारचा अपघात होऊ नये म्हणून तिच्या नातेवाईकांनी तेराव्याच्या कार्यक्रमात हेल्मेट वाटले.

विभाग