मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Live: एलपीजी टँकर नदीत कोसळला.. मुंबई-गोवा महामार्ग रात्रभर बंद

Live: एलपीजी टँकर नदीत कोसळला.. मुंबई-गोवा महामार्ग रात्रभर बंद

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 23, 2022 09:58 AM IST

एलपीजीची वाहतूक करणारा टँकर नदीत (LPG Tanker Accident) कोसळल्याने टँकमधून गॅसची गळती होत आहे. त्यामुळे सतर्कता म्हणून आज रात्रभर मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात असून तब्बल १८ तासांपासून या मार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली आहे.

एलपीजी टँकर नदीत कोसळला
एलपीजी टँकर नदीत कोसळला

मुंबई – गोवा-मुंबई महामार्गावरील (Mumbai goa highway) लांजा तालुक्यात आंजणारी पुलावरून टँकर नदीत कोसळला. पुलाचा कठडा तोडून एलपीजीची वाहतूक टँकर नदीत कोसळला. एलपीजीची वाहतूक करणारा टँकर नदीत (LPG Tanker Accident) कोसळल्याने टँकमधून गॅसची गळती होत आहे. त्यामुळे सतर्कता म्हणून  रात्रभर मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तब्बल १८ तसंपासून वाहतूक ही ठप्प झाली आहे. सध्या टँकर मधील गॅस काढण्याचे काम सुरू असून या नंतरच वाहतूक ही सुरळीत करण्यात येणार आहे. दरम्यान, या महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पाली ते लांजा या दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे.

हा कंटेनर मुंबईहून गोव्याकडे काँप्रेस्ड एलपीजी घेऊन जात होता. लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावर हा कंटेनर आला असता अपघातग्रस्त झाला. मुंबई गोवा महामार्गावरील या भागातून जाणारा टप्पा बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग पालीतून दाभोळेमार्गे लांजा असा असणार आहे.

आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. एलपीजी टँकरची गळती तात्पुरत्या स्वरुपात रोखण्यात आली आहे. उरण आणि गोव्यावरून दोन टीम अपघातस्थळी दाखल होणार आहेत. या टँकरमध्ये २८ हजार किलो इतका प्रचंड एलपीजी गॅस भरलेला आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग