
मुंबई - मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात अवघड वळणावर एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. टँकर पलटल्यानंतर त्यातून गॅस गळती होऊ लागल्याने परिसरातील गावात भीतीचे वातावरण आहे. खेड पोलिसांनी घाट दोन्ही बाजूंनी तात्काळ बंद केला आहे. घाट बंद झाल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.
‘या’ पर्यायी मार्गाचा वापर -
पोलिसांनी घाटाच्या दोन्ही बाजूंनी नाकाबंदी करत वाहतूक रोखली आहे. भोस्ते घाट बंद झाल्यामुळे घाटाला पर्याय मार्ग असणाऱ्या वेरळ- कोंडीवली-शिव मार्गे बोरज या पर्यायी मार्गावरून लहान वाहने जात आहेत तर मोठी वाहने महामार्गावरती रखडून आहेत. घाटातील वाहतूक सुरू होण्यास किती वेळ लागेल याबाबत काहीच माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान भोस्ते घाट हा मृत्यूचा सापळा बनत चालला असून काही दिवसांपूर्वीही एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटला होता.
संबंधित बातम्या
