Maharashtra Rain Update -बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता-low pressure over bay of bengal to bring rain in parts of maharashtra ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain Update -बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Rain Update -बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

Sep 06, 2024 08:22 PM IST

maharashtra weather update - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सप्टेंबर ६-९ दरम्यान राज्यात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता
सप्टेंबर ६-९ दरम्यान राज्यात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडल्याने तब्बल साडे अकरा लाख हेक्टरवर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत परतीच्या मार्गावर असणाऱ्या पावसाबद्दल हवामान खात्याने आज आणखी ताजे अपडेट दिले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी बंगालच्या उपसागरात पश्चिम-मध्य आणि लगतच्या वायव्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा पुढील ९ सप्टेंबरपर्यंत हळूहळू उत्तरेकडे सरकून बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग, पश्चिम बंगालमधील गंगेचे खोरे, ओडिशाचा उत्तर भाग आणि बांग्लादेशाच्या किनारी भागात अधिक तीव्र होत जाणार आहे. यामुळे पुढील ३-४ दिवसांत पश्चिम बंगालमधील गंगेचे खोरे, लगतचा उत्तर ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगडचा उत्तर भागात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आंध्रप्रदेशचा समुद्री भाग आणि यनम येथे ८ आणि ९ सप्टेंबर रोजी आणि तेलंगणात ९ आणि १० सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामाना खात्याने वर्तवली आहे.

शनिवार ते सोमवारदरम्यान कोकण, मध्य-महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

उद्या शनिवार, रविवार आणि सोमवारी पूर्व राजस्थान, गुजरातचा काही भाग आणि महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्रातला घाट माथ्याच्या परिसरात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भातील काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातली मोठी धरणे १०० टक्के भरली

राज्यात सहा वर्षानंतर यंदा प्रथमच सहा मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे यंदा या धरण क्षेत्रातला पाण्याचा मोठा प्रश्न सुटला आहे. या धरणांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील उजनी, कोयना, मराठवाड्यातील जायकवाजी, ठाणे जिल्ह्यातील भातसा धरण आणि नाशिक जिल्ह्यात असलेल्या वैतरणा धरणाचा समावेश आहे. गेल्या वर्षी या सुमारास वरील पाच धरणांमधील पाणीसाठा ६५ टक्क्यावर होता. यंदा राज्यात सरासरीच्या १२१ टक्के पाऊस झाला असून १०२ टक्के पेरण्या झाल्या असल्याची माहिती राज्य सरकारने दिली.

Whats_app_banner