मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : प्रेयसीचे चॅट वाचून प्रियकर संतापला; भर रस्त्यात दिला चोप

Pune Crime : प्रेयसीचे चॅट वाचून प्रियकर संतापला; भर रस्त्यात दिला चोप

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 10, 2022 04:19 PM IST

पुण्यात एका प्रेयसीला तिचा मोबाइल प्रियकरच्या हातात देणे चांगलेच महागात पडले आहे. तिचे मेसेज वाचून भडकल्याने दोघांत रस्त्यातच हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Crime News
Crime News (HT_PRINT)

पुणे : विश्वासाने आपला मोबाईल प्रियकरच्या हातात देणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले. प्रियकराने तरुणीच्या मोबाइल मधले मेसेज वाचले. यात एका तरुणासोबत केलेले चॅट वाचून तो चांगलाच संतापला. भर रस्त्यातच त्याने आपल्या प्रेयसीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या नंतर तरुणीनेही थेट पोलिस ठाणे गाठत प्रियकरांविरोधात तक्रार दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार दोन दिवसांपूर्वी मार्केट यार्ड परिसरात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भर रस्त्यावर घडला. या प्रकरणी २३ वर्षीय प्रेयसीने तक्रार दिली असून मार्केटयार्ड पोलिसांनी या प्रियकराविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

फिर्यादी तरुणी ही मार्केटयार्ड परिसरात राहते. आरोपी तरुण आणि पीडित तरुणी हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यांचात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघेही एकमेकांशी तासंतास बोलत असायचे. तसेच ते एकमेकाना भेटेलाही येत असे. दोन दिवसांपूर्वी हा तरुण तरुणीला भेटण्यासाठी मार्केट यार्ड परिसरात गेला होता. दोघेही येथील एका रस्त्यावर थांबले होते. गप्पा मारत असताना प्रियकराने तिचा मोबाइल हातात घेतला. तरुणीने यावर काही आक्षेप घेतला नाही. मात्र, थोड्या वेळाने प्रियकर तिचे व्हाटसअप वरील मेसेज वाचू लागला. यावेळी तरुणीने तिच्या बहिणीशी केलेले चॅट त्याने वाचले. मात्र हे चॅट बहिणीशी नसून एका तरूणाशी केल्याचा संशय त्याला आला. यामुळे तो भडकला. त्याला त्याचा राग नावर झाल्याने भर रस्त्यात त्याने त्याच्या प्रेयसीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने शिवीगाळही केली. या मारणीमुळे प्रेयसिने थेट मार्केटयार्ड पोलिस ठाणे गाठले आणि प्रियकरविरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IPL_Entry_Point

विभाग