मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhaji Nagar : रात्रभर एकत्र थांबले अन् सकाळी प्रेमीयुगुलाने हॉटेलच्या रुममध्ये संपवले जीवन

Sambhaji Nagar : रात्रभर एकत्र थांबले अन् सकाळी प्रेमीयुगुलाने हॉटेलच्या रुममध्ये संपवले जीवन

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 07, 2023 04:33 PM IST

Chhatrapati sambhaji nagar : संभाजीनगरमध्ये हॉटेलच्या रुमवर एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. हॉटेलच्या रुमवर एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. ही घटना शहरातील एकानामांकित हॉटेलमध्ये घडली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश सुरेश राऊत आणि दिपाली अशोक मरकड असं या मृत प्रेमीयुगूलाची नावं आहेत. बुधवारी रात्री ते दोघे शहरातील पंचवटी हॉटेलमध्ये थांबले होते. सकाळच्या सुमारास त्यांनी रूम नंबर ३०५ मध्ये गळफास घेऊन आयुष्य अखेर एकत्रच केली. हे प्रमीयुगुल शहरानजीक असलेल्या बिडकीन गावातील रहिवासी होते.

दोघांची आत्महत्या आहे की, घातपात आहे याचा वेदांतनगर पोलीस तपास करत आहेत.या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दोघांनी आत्महत्या का केली याबाबत अजूनही कोणतंही कारण समजू शकलं नाही.

 

पोलिसांनी ते थांबलेल्या रुमची पूर्ण झडती घेतली मात्र कुठेही सुसाईड नोट अजून सापडली नाही. पोलीस दोघांचे मित्र आणि नातेवाईकांची चौकशी करत आहेत.

 

WhatsApp channel