प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी ठरलं लग्न, प्रियकरानं तिला शेतात बोलावलं आणि पेट्रोल ओतून पेटवून दिलं
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी ठरलं लग्न, प्रियकरानं तिला शेतात बोलावलं आणि पेट्रोल ओतून पेटवून दिलं

प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी ठरलं लग्न, प्रियकरानं तिला शेतात बोलावलं आणि पेट्रोल ओतून पेटवून दिलं

Jan 30, 2025 09:14 PM IST

Lover Sets Girlfriend on Fire: उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे एका तरुणाने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. त्यानंतर स्वत:ही आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. तर, तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे.

प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी ठरलं लग्न, प्रियकरानं तिला शेतात बोलावलं आणि पेट्रोल ओतून पेटवून दिलं
प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी ठरलं लग्न, प्रियकरानं तिला शेतात बोलावलं आणि पेट्रोल ओतून पेटवून दिलं

Lover Burnt Girlfriend Alive: उत्तर प्रदेशातील प्रतापगडातून खळबळजनक घटना घडली आहे. कोहंडोर परिसरात एका व्यक्तीने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत पेटवून दिले. त्यानंतर स्वत:ही आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. तर, संबंधित तरुण गंभीररित्या भाजला गेला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, विकास कुमार यादव (वय, २९) असे प्रियकराचे नाव असून तो चंडोका येथील रहिवासी आहे. विकास याचे लोलीपोख्ता खाम येथील नालू यादव (वय, २२) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. परंतु, नीलू यादवचे दुसऱ्या तरुणाशी लग्न ठरले. हे लग्न येत्या २ मार्चला होणार होते. यानंतर विकासने नीलूला भेटण्यासाठी शेतात बोलवले. त्यानंतर त्याने स्वत:वर आणि नीलूवर पेट्रोल ओतले आणि तिला पेटवून दिले. या घटनेत गंभीर भाजल्याने नीलूचा जागीच मृत्यू झाला. तर, विकास यादव गंभीररित्या भाजला गेला. त्याच्यावर जवळच्या वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक शिवनारायण वैश्य यांनी दिली.

सेंट्रल नोएडाच्या सूरजपूर पोलिसांनी घरमालकाची हत्या केल्याप्रकरणी भाडेकरूला अटक केली. ही घटना गेल्या आठवड्यात घडली. दिल्लीतील कुंडली येथे क्लिनिक चालवणारे घरमालक दिनेश गौर आरोपी राहत असलेल्या घरी आले. दारूच्या नशेत असलेल्या दिनेशने तिसऱ्या मजल्यावर राहणारा आरोपी आणि त्याची प्रेयसीला आपल्या खोलीत बोलावले. दोघेही खोलीत आल्यानंतर दिनेशने सतत आरोपीला बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने दिनेशला त्याच्या प्रेयसीचा विनयभंग करताना पाहिले. त्यानंतर आरोपीने दिनेशवर हातोड्याने हल्ला केला. या हल्ल्यात दिनेशचा मृत्यू झाला. या घटनेनंतरर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास करून आरोपीला अटक केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर