मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लंडन ते मुंबई विमानप्रवासात अभियंत्याचे साडेसात लाखांचे दागिने लंपास, पुण्यात तक्रार दाखल

लंडन ते मुंबई विमानप्रवासात अभियंत्याचे साडेसात लाखांचे दागिने लंपास, पुण्यात तक्रार दाखल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 02, 2024 08:49 PM IST

Jewellery Lost In Flight : एका अभियंत्याचे जवळपास साडे सात लाखांचे दागिने लंडन-मुंबई विमान प्रवासात चोरीला गेले आहेत. याप्रकरणी पुण्याचील वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

लंडन-पुणे विमान प्रवासात एका अभियंत्याचे जवळपास साडे सात लाखांचे दागिने चोरीला गेले आहेत. पुण्यात एका लग्नासाठी लंडनवरून विमान प्रवास करताना संगणक अभियंत्याच्या सामानातून सात लाख ६० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास झाले. ही घटना गेल्या महिन्यात घडला होता. 

याप्रकरणी सचिन हरी कामत (वय ४४, रा. वाकड, सद्या रा. लंडन) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कामत हे संगणक अभियंता आहेत. नोकरीनिमित्त ते लंडनला राहतात. पुण्यात एका नातेवाइकाच्या लग्नासाठी ते येत होते.

लंडन येथून निघताना त्यांनी त्यांच्या सामानाच्या चार पिशव्या सीलबंद न करता सौदिया एअरलाईन्सकडे दिल्या होत्या. त्या चार पिशव्यांमध्ये त्यांनी कपडे, अत्तर, चॉकलेट, इलेक्ट्रिक उपकरणे आणि १५२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ठेवले होते. कामत हे मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांना त्यांच्या पिशव्या आढळल्या नाहीत. 

मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी पिशव्यांचे ओळखपत्र मुंबई विमानतळ येथे जमा केले. त्यानंतर एका कुरिअर कंपनीद्वारे त्यांना त्यांच्या पिशव्या वाकड येथे मिळाल्या. त्यांनी पिशव्या तपासून पाहिल्या असता, त्यात त्यांचे सात लाख ६० हजारांचे दागिने आढळून आले नाहीत. त्याबाबत त्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. फौजदार माने तपास करीत आहेत.

WhatsApp channel

विभाग