मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jitendra Awhad on Ram : प्रभू राम शिकार करून मांसाहार करत होता, जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त विधान

Jitendra Awhad on Ram : प्रभू राम शिकार करून मांसाहार करत होता, जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त विधान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 03, 2024 10:19 PM IST

Jitendra Awhad On Prabhu Ram : राम आमच्या बहुजनांचा आहे. राम शिकार करत होते व मांसाहार करत होते. त्यामुळे आम्हीही मांसाहारी आहोत, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

Jitendra Awhad On Ram
Jitendra Awhad On Ram

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू राम यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी केली आहे. शिर्डी येथे पक्षाच्या मेळाव्यात बोलताना आव्हाड यांनी राम मंदिर उद्घाटनाबाबत विधान करून नवा वाद निर्माण केला आहे. आव्हाड म्हणाले की, राम आमच्या बहुजनांचा आहे. राम शिकार करत होते व मांसाहार करत होते. त्यामुळे आम्हीही मांसाहारी आहोत. मात्र तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवण्याचा प्रयत्न करत आहात. आपल्या विधानाच्या सत्यतेसाठी त्यांनी तर्क दिला की, १४ वर्ष वनवासात राहणारा व्यक्ती शाकाहारी भोजन कुठून मिळवत असेल.

राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातअसतो.

भाषणानंतर माध्यमांशी बोलतानाआव्हाड म्हणाले की, मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनवले जात आहे.  मात्र वनवासात काय रामाने मेथीची भाजी खाल्ली असेल का? देशात ८० टक्के लोक मांसाहारी आहेत व ते राम भक्त आहेत.

आपल्या विधानाच्या समर्थनार्थ आव्हाड यांनी मानव जातीच्या इतिहासाचे उदाहरण दिले. त्यांनी म्हटले की, हजारो वर्षापूर्वी जेव्हा शेती केली जात नव्हती तेव्हा सर्व लोक मांसाहार करत होते. आव्हाड म्हणाले की, आम्ही कधीच तोंडात राम व मनात रावण ठेवत नाही. राम दर्शनासाठी जात असलेल्या तीन पक्षांच्या नेत्यांना विचारतो की, केवळ आपल्या आई-वडिलांच्या इच्छेमुळे १४ वर्षाचा वनवास भोगणारा कोणी राम या पक्षात आहे का?

WhatsApp channel