Punekar got long weekend : सलग चार दिवस सुट्टी मिळाल्याने पुणेकरांची चांगलीच चंगळ झाली आहे. अनेकांनी या सुट्टीच्या फायदा घेत फिरण्याचा प्लॅन केला आहे. आज सोमवारी ईद व उद्या गणेश विसर्जन असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सुट्टी जाहीर केली आहे. या सुट्टीमुळे शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार अशा सलग चार सुट्ट्या पुणेकरांना मिळाल्याने अनेकांचा वीकेंड लांबणार आहे.
पुण्यातील गणेशोत्स जगात प्रसिद्ध आहेत. येथील विसर्जन मिरवणुकांचे अनेकांना आकर्षण आहे. ही विसर्जन मिरवणूक दोन दिवस चालते. या दिवशी सुट्टी जाहिर केली जाते. यंदा मंगळवारी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन होणार आहे. त्यामुळे या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर, सोमवारी ईद-ए-मिलाद असल्याने पुण्यात सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे सोमवार व मंगळवार अशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर शनिवार आणि रविवार असा विकेंड आल्याने सलग चार दिवस सुट्ट्या पुणेकरांना मिळाल्या आहेत.
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी शनिवारी अधिकृत पत्र, जारी करून महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सोमवारची व मंगळवारी सुट्टी असल्याचे जाहीर केली. मंगळवारी गणेश विसर्जनासाठी रस्ते बंद असल्याने बहुतांश खासगी आणि सरकारी कार्यालयांनी आधीच सुट्टी जाहीर केली आहे. शिवाय, बहुतेक कार्यालयांनी बुधवार अर्धा दिवस घोषित केला आहे, कारण गणेश विसर्जन पूर्ण होण्यासाठी २४ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.
लाँग वीकेंडमुळे अनेकांनी छोट्या सहलींचे नियोजन केले आहे. शहराजवळील पर्यटन स्थळे जास्त प्रमाणात येण्याची शक्यता आहे. काही नागरिकांनी तर आधीच बूकिंग करून ठेवले आहेत. त्यामुळे पुण्यातील पर्यटन स्थळे देखील फुल्ल झाली आहेत.