Honey Bee attack Near Ekvira Temple : लोणावळ्यातील एकवीरा गडावर नववर्षानिमित्त देवीच्या दर्शनासाठी मोठ्या मोठ्या प्रमाणात भाविकांनी कार्ला गडावर गर्दी केली होती. यावेळी देवीची पालखी देखील काढण्यात आली. दरम्यान, काही हुल्लडबाज भाविकांनी फटाके फोडल्याने देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसेच काही भाविक जखमी झाले आहेत.
लोणावळ्यातील कार्ला गडावर एकवीरा दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक आले होते. देवीच्या दर्शनासाठी भाविक रांगेत लागले होते. यावेळी काही भाविकांनी मंदिराजवळ रंगीबेरंगी फटाके फोडले. हे फटाके फोडने, भाविकांना चांगलेच महागात पडले. फटक्यांच्या धूरामुळे मधमाश्यांचे पोळ उठले व त्यांनी थेट भविकांवर हल्ला केला. मध्यमांच्या चाव्यामुळे अनेक भाविक जखमी झाले आहे. भाविकांनी सैरावैरा पळत स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक भाविकांना मधमाशांनी डंख मारल्याने ते जखमी झाले आहे.
मुंबईच्या कुलाबा येथून कार्ला गडावर देवीची पालखी आली होती. या या पालखीत सोहळ्यात आलेल्या काही जणांनी पालखीसमोर फटाके फोडले. या गडावर फटाके फोडण्यास बंदी असतांना देखील काही भाविकांनी या कडे दुर्लक्ष केलं. याचा फटका सर्व भाविकांना बसला आहे. त्यामुळे या गडावर कायम स्वरूपी फटाके फोडण्यास बंदी घालण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
मंदिराजवळ कलर धुराचेचे फटाके लावल्यामुळे मधमाश्यांच्या पोळाला इजा पोहचली. यामुळे मधमाश्यांनी भविकांवर हल्ला करत अनेकांना डंख मारला. यामुळे भाविकांची पळापळ झाली तर बहुतेक भाविकांना मध्यमाश्यानी चावा घेऊन जखमी केले. जखमी भाविकांना तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून काही जखमींना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले आहे. तर ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना काही देखरेखी खाली ठेवण्यात आले आहे.
संबंधित बातम्या