मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लोणावळा फिरण्यासाठी चार मित्र आले, अन् पर्यटकांसोबत तुंगार्ली धरण परिसरात घडली दुर्दैवी घटना

लोणावळा फिरण्यासाठी चार मित्र आले, अन् पर्यटकांसोबत तुंगार्ली धरण परिसरात घडली दुर्दैवी घटना

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 06, 2024 05:43 PM IST

Lonavala Tungarli Dam : लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या एका २२ वर्षीय तरुणाचा तुंगार्ली धरणात बुडून मृत्यू झाला.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

चार मित्र पर्यटनासाठी लोणावळ्यात आले होते. त्यातील एका २२ वर्षीय तरुणाचा तुंगार्ली धरणात बुडून मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण पाण्यात बुडाला. लोणावळ्याच्या तुंगार्ली धरण परिसरात ही घटना घडली. आज (मंगळवार) सकाळी या तरुणाचा मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आला. 

अभिषेक सिंह रावत (वय, २२) असे या तरुणाचे नाव आहे. तो उत्तराखंडचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. 

चार तरुण सोमवारी तुंगार्ली धरणात परिसरात फिरण्यासाठी आले होते. सायंकाळच्या सुमारास ते धरणात पोहण्यासाठी उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्यापैकी एक जण पाण्यात बुडाला. यावेळी त्याच्या सोबतच्या इतर मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी आले. त्यांनी तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. 

लोणावळा शहर पोलीस व शिवदुर्ग रेस्क्यु पथकाला माहिती मिळताच त्यांनी धरणावर धाव घेतली. रेस्क्यु पथकाने शोधाशोध केली मात्र अंधार पडल्याने शोधमोहिमेत अडथळा येत होता. त्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले. आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करून तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. 

WhatsApp channel

विभाग