lonavala News : लोणावळ्यात पर्यटनाला जाताय? तर ही बातमी वाचा! लागू झालेत हे नवे नियम
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  lonavala News : लोणावळ्यात पर्यटनाला जाताय? तर ही बातमी वाचा! लागू झालेत हे नवे नियम

lonavala News : लोणावळ्यात पर्यटनाला जाताय? तर ही बातमी वाचा! लागू झालेत हे नवे नियम

Jul 03, 2024 06:01 AM IST

lonavala new rule : लोणावळ्यात वर्षा पर्यटन करण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेमुळे प्रशासन सतर्क झाले असून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.

लोणावळ्यात पर्यटनाला जाताय? तर ही बातमी वाचा! लागू झालेत हे नवे नियम
लोणावळ्यात पर्यटनाला जाताय? तर ही बातमी वाचा! लागू झालेत हे नवे नियम

Lonavla new rule : लोणावळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आता नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही पर्यटनासाठी लोणावळ्यात जाण्याचा प्लॅन करणार असाल तर ही नियमावली माहिती करून त्यानुसार प्लॅन करावा लागणार आहे. प्रशासनाने ६ नियम येथे येणाऱ्यांसाठी लागू केले आहेत.

भुशी डॅम परिसरात असणाऱ्या एका धबधब्यात अन्सारी-सय्यद कुटुंबीय वाहून गेले. त्यांच्या कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. या घटनेची गंभीर दखल सरकारने घेतली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आता लोणावळ्यात नवी नियमावली लागू करण्यात आले आहे. लोणावळ्यात अन्सारी व सय्यद कुटुंबीय जिथून वाहून गेले, त्या परिसरात जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास ३१ ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या सोबतच पाच नवे नियम देखील लागू करण्यात आले आहे.

प्रशासाने लागू केलेल्या नव्या नियमाप्रमाणे आता लोणावळ्यातील सहारा पुलावर वाहने पाकींग करण्यासाठी पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तर सहारा पुलाच्या समोरच्या बाजूला असलेल्या तीन छोटया धबधब्याच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी देखील आता बंदी घालण्यात आली आहे. भूशी धरणाच्या रेल्वेच्या गेस्ट हाऊस पासून वरच्या बाजूला जाण्यासाठी गेस्ट हाऊस पासून देखील बंदी घालण्यात आली आहे. भूशी धरणाच्या वेस्ट वेअरच्या डाव्या बाजूने वन विभागच्या जागेतून वरच्या बाजूच्या धबधब्याकडे जाण्यासाठी देखल आता बंदी घालण्यात आली आहे. तर लोणावळ्यातील प्रसिद्ध लायन्स पॉईट, टायगर पॉईट शिवलिंग पॉईट येथे संध्याकाळी ६ पासून ते सकाळी ६ पर्यंत फिरण्यास बंदी घालण्यात अली आहे.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे. तसेच या ठिकाणी येणारे पर्यटक कोणत्याही प्रकारची खबरदारी घेत नअसल्याने अपघात वाढले असून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

हुल्लडबाजी करणाऱ्यांवर होणार कारवाई

लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना या नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. या नियमावलीचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर