मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhushi Dam Accident : घरातील लग्नकार्य आटोपून पर्यटनासाठी भुशी डॅमवर आले आणि काळानं घाला घातला!

Bhushi Dam Accident : घरातील लग्नकार्य आटोपून पर्यटनासाठी भुशी डॅमवर आले आणि काळानं घाला घातला!

Jul 01, 2024 01:19 PM IST

Lonavala Bhusi Dam Family Drown in Waterfall: लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात वर्षा पर्यटणासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले असून यातील चौघांचे मृतदेह सापडले आहे. एकाचा शोध सुरू आहे.

भुशी धरणावर पर्यटनासाठी पुण्यातून आलेल्या कुटूंबातील ५ जण गेले वाहून
भुशी धरणावर पर्यटनासाठी पुण्यातून आलेल्या कुटूंबातील ५ जण गेले वाहून

Lonavala Bhusi Dam Family Drown in Waterfall : पुण्यातील सय्यद नगर येथील अन्सारी कुटुंबीय रविवारी घरातील लग्नकार्य आटोपून लोणावळा येथील भुशी डॅम परिसरात वर्षाविहारासाठी गेले होते. मात्र, धरणाच्या पाठीमागे असलेल्या एका डोंगरातील धबधब्यात जाणे या कुटुंबियांच्या जिवावर बेतले आहे. धबधब्याच्या पाण्यात पाच जण वाहून गेले असून यातील चौघांचे मृतदेह सापडले आहे. तर एकजण बेपत्ता आहे. लोणावळा येथील शिवदुर्ग पथक, वन्यजीव रक्षक व आपदा मित्र मंडळातर्फे शोधकार्य सुरू आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

पुण्यातील हडपसर येथील सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या अन्सारी कुटुंबात चार दिवसांपूर्वीच एक विवाह झाला होता. त्यामुळे या नवदाम्पत्यासह घरातील नातेवाईक लोणावळा येथे रविवारी फिरण्यासाठी आले होते. १७ सीटर गाडी करून हे कुटुंब लोणावळा येथे गेले होते. भुशी डॅम परिसरातील एका डोंगरात असणाऱ्या एका धबधब्यात हे कुटुंब उतरलं होतं. मात्र, अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने ७ ते ८ जण वाहून गेले. त्यांचा वाहून जातानाचा व्हिडिओ हा सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ होता. यात कुटुंबातील तीन मुली. मुलगा व महिला, असे पाच जण वाहून गेल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले होते.

पाण्याच्या प्रवाहात नवदाम्पत्य देखील वाहून गेले होते. मात्र, सुदैवाने ते वाचले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाहून गेलेल्यांपैकी चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. रात्र झाल्याने शोधकार्य थांबवन्यात आले. आज सकाळी शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आल्यावर आणखी एक मृतदेह सापडला. हे मृतदेह तळेगाव येथील सरकारी अणालयात शवविच्छेद‌नासाठी नेण्यात आले आहे.

नूर शाहिस्ता अन्सारी (वय ३७), अमिना आदिल अन्सारी (वय १३), मारिया अन्सारी (वय ७), हुमेदा अन्सारी (वय ६). अदनान अन्सारी (४ वर्षे, सर्व जण रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे), अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत.

सुरवातीला धबधब्याच्या एका खडकावर पाणी कमी असल्याने ते खडकावर बसले होते. मात्र, डोंगरावर मोठा पाऊस झाल्याने अचानक पाण्याचा प्रवाह वाढून हे पाच जण वाहून गेले. या घटनेची माहिती हडपसर येथील त्यांचे शेजारी आणि नातेवाईकांना समजताच त्यांच्यावर दुख:चा डोंगर कोसळला. सरवदनभर येथील मौलाना असणारे सलमान अन्सारी याच्या दोन मुली, त्यांची मेहुणी व मेहुणीची एक मुलगी आणि मेहुण्याचा एक मूला, असे पाच जण या वाहून केले. हे सर्वजण शाळेत शिकत होते. वाहून गेलेली चारही मुले लहान असून त्याची मेहुणी दूर अन्सारी ही घरकाम करत होत्या.

WhatsApp channel
विभाग