लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मोदींनी मुंबईवर लक्ष केंद्रीत केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) आज मुंबईत रोड शो होत आहे. पंतप्रधान मोदींचा घाटकोपरमध्ये रोड शो होणार असून सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई मेट्रोसायंकाळी सहा वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली आहे.घाटकोपर ते जागृतीनगर मेट्रो सेवा बंद केली आहे. सायंकाळी गर्दीच्या वेळीच मेट्रो बंद राहिल्याने कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. घाटकोपर मेट्रो स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे.
काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी घाटकोपर मेट्रो स्थानकावरील गर्दीचा व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदी व भाजपवर निशाणा साधला आहे. वर्षा गायकवाड यांनी म्हटले की, शहेनशहाच्या स्वागतासाठी मुंबईतील बंद करण्यात आली आहे. तेही अचानकपणे. हे दृष्य आहे घाटकोपर मेट्रो स्टेशनवरील. शहेनशहाच्या खातिरदारीमुळे सामान्य मुंबईकरांचे कसे हाल होत आहेत, पाहा आणि यांचे भक्त मॅजिक म्हणत आहेत.
मेट्रोकडून दिलेल्या माहितीनुसार सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रोसेवा बंद राहणार आहे. जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रो स्थानका दरम्यान संध्याकाळी ६ वाजल्यापासून पुढील सूचना मिळेपर्यंत मेट्रो सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.
मोदींचा आजचा रोड शो भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी होणार आहे. घाटकोपरमधील अशोक सिल्क मिल जवळून मोदींच्या रोड शोला सुरुवात होणार असून घाटकोपर पूर्वेकडील पार्श्वनाथ जैन मंदिराजवळ त्याचा समारोप होईल. यामुळे ईशान्य मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मुंबई मेट्रो सायंकाळी सहा वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोसाठी घाटकोपरची निवड का करण्यात आली, याचे कारण म्हणजे मोदींच्या रोड शोचा परिणाम हा मुंबईतील पाच लोकसभा मतदारसंघांवर थेट पडणार आहे. पूर्व उपनगरं आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा दुवा असं सध्या घाटकोपरला मानलं जातं. तसेच या भागातउच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय तसेच झोपडपट्टीतील कामगार असे सर्व प्रकारचे लोक राहतात. त्याचप्रमाणे येथे मराठी गुजराती तसेच हिंदू मतदार मोठ्या संख्येने आहेत.
संबंधित बातम्या