Dry days in Mumbai in May: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामुळे यंदा मुंबईसह पालघर, कल्याण आणि ठाण्यातही १८ ते २० मे या कालावधीत ड्राय डे पाळण्यात येणार आहे. हे भाग महत्त्वाचे मतदारसंघ असून २० मे रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, केवळ मतदान सुरू असलेल्या मतदारसंघातच नव्हेतर आजूबाजूच्या मतदारसंघांमध्येही ड्राय डेचे पालन करण्यात यावे. राज्यभरात निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेला चालना मिळावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मुंबईतील सर्व बार आणि वाईन शॉप १८ मे रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून बंद होतील आणि २० मे रोजी संध्याकाळी ५ वाजता पुन्हा सुरू होतील. मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच ४ जून रोजी मुंबईत पुन्हा ड्राय डे असेल. यापूर्वी पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघात १३ मे रोजी मतदान क्षेत्रात मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली होती.
लोकसभा निवडणुकीमुळे हरियाणातील गुडगावमध्ये २३ मे रोजी सायंकाळी ०६.०० ते २५ मे रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत ड्राय डे पाळण्यात येणार आहे. या काळात संपूर्ण दिल्ली-एनसीआरमध्येही मद्यविक्रीवर बंदी असणार आहे कोलकात्यात मे महिन्यात सात ड्राय डे ठरले, ज्याचा परिणाम एका वीकेंडवर आणि दुसऱ्या आठवड्याच्या काही भागावर झाला. १८ मे रोजी संध्याकाळी ०६ वाजल्यापासून ते १९ मे संध्याकाळी ०६ वाजेपर्यंत ड्राय डे दिवस असेल. तसेच २० मे हा देखील मतदानामुळे ड्राय डे असणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई ईशान्य, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिणसह ठाणे, कल्याण, पालघर, धुळे, दिंडोरी, नाशिक आणि भिवंडी येथे १९ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे.
महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमधील ३६ जागांसाठी मतदान होणार आहे.
संबंधित बातम्या