Chandrapur: तळीरामांचा आनंद गगनात मावेना; आनंदाच्या शिध्यात मिळणार महागडी व्हिस्की आणि बिअर?-loksabha election 2024 chandrapur constituency candidates akhil bharatiy manavta party vanita raut promise to served ex ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chandrapur: तळीरामांचा आनंद गगनात मावेना; आनंदाच्या शिध्यात मिळणार महागडी व्हिस्की आणि बिअर?

Chandrapur: तळीरामांचा आनंद गगनात मावेना; आनंदाच्या शिध्यात मिळणार महागडी व्हिस्की आणि बिअर?

Mar 31, 2024 05:14 PM IST

Loksabha Election Chandrapur Constituency: चंद्रपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी आपल्या मतदारांना दिलेल्या अश्वासनाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी आपल्या मतदारांना आनंदाच्या शिध्यात महागडी व्हिस्की आणि बिअर देणार असल्याचे अश्वासन दिले.
भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी आपल्या मतदारांना आनंदाच्या शिध्यात महागडी व्हिस्की आणि बिअर देणार असल्याचे अश्वासन दिले.

Chandrapur Constituency Candidates Vanita Raut News: आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून देशातील राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. आपपल्या उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार मतदारांवर अश्वासनांचा वर्षाव करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर मतदारसंघातून उभ्या असलेल्या अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी आपल्या मतदारांना दिलेल्या अश्वासनाची जोरदार चर्चा रंगली आहे. निवडून आल्यास मतदारांना आनंदाच्या शिध्यात व्हिस्की आणि बिअर देणार असल्याचे त्यांनी अश्वासन दिले.

वनिता राऊत म्हणाल्या की, "फक्त श्रीमंतांनीच महागडी व्हिस्की आणि बिअर का प्यावी? देशी पिणाऱ्या गरिबांनादेखील कधी- कधी चांगली दारू प्यायला मिळावी. निवडून आल्यास चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना आनंदाच्या शिध्यात व्हिस्की आणि बिअर दिले जाणार", असे आश्वासन वनिता यांनी दिले. यापूर्वी, २०१९ मध्ये देखील वनिता राऊत यांनी चिमूर विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी देखील त्यांनी गाव तिथे दारूचे दुकान असे भन्नाट आश्वासन दिले होते.

दानवे विरुद्ध खैरे दिलजमाई! प्रचार करणार नाही म्हणणारे दानवे थेट पेढे घेऊन पोहचले खैरेंच्या घरी; वाद मिटला

२०१९ विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना वनिता म्हणाल्या होत्या की, "चंद्रपूरलगतच्या नागपूर जिल्ह्यात दारू बंदी नाही. मग चंद्रपुरातील नागरिकांनी काय वाईट केले हे, ज्यांना दारूबंदीसारखे निर्बंध घालण्यात आले. चंद्रपुरातील दारूबंदी उठवल्यानंतर नागरिकांना रोजगार मिळेल", असा दावा त्यांनी केला होता. मात्र, मात्र चंद्रपूरकरांनी त्यांच्या या आश्वासनाला फार दाद दिली नाही. या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकरावा लागला होता.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. तर, भाजपने सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विश्वास दाखवला आहे. धानोरकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत असताना अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांच्या आश्वासनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Whats_app_banner