मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

May 19, 2024 12:08 AM IST

Mumbai lok sabha Election : मुंबई उपनगर जिल्ह्यात एकुण१६ हजार ११६दिव्यांग मतदार आहे. या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा काही अडचण असल्यास त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी १ हजार १०६दिव्यांग मित्रांचीही नेमणूक करण्यात आली आहे.

दिव्यांग मतदारांसाठी मोफत बस
दिव्यांग मतदारांसाठी मोफत बस

मुंबई उपनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना २० मे २०२४रोजी आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने दिव्यांग मतदारांना मतदार संघनिहाय विनामूल्य वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून  संपर्क साधण्यासाठी http://tiny.cc/s7b5yz या लिंकवर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे जिल्हा दिव्यांग समन्वयक अधिकारी  प्रसाद खैरनार सांगितले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबई उपनगर जिल्ह्यात एकुण १६ हजार ११६दिव्यांग मतदार आहे. या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा काही अडचण असल्यास त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी १हजार १०६ दिव्यांग मित्रांचीही नेमणूक करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग मतदारांना प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी २५रींगरुट व शटल रूटवर दिव्यांग फ्रेंडली लो-फ्लोअर बस धावणार आहेत. या बसमधून ‘हात दाखवा”बस थांबवा’ या धर्तीवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदार या वाहतूक सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

एकही मतदार मागे राहू नये या संकल्पानुसार मुंबई जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी  २० मे  २०२४ रोजी मतदानासाठी विशेष विनामूल्य बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  आज वांद्रे पूर्व येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य बस सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

मुंबई उपनगर जिल्ह्यात ४ लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यादृष्टीने  विधानसभा मतदारसंघानिहाय ठरविलेल्या एका निश्चित मार्गावर ६१३ ठिकाणी बेस्ट मार्फत व्हिलचेअर प्रवेश योग्य मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता यावे यासाठी ११०६  व्हिलचेअर देखील मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इझी टु मुव्ह या संकल्पने अंतर्गत ज्या विधानसभा मतदारसंघात लोकोमोटर म्हणजेच अस्थिव्यंग मतदारांची संख्या तुलनेने अधिक आहे. अशा ९ विधानसभा मतदारसंघात व्हिलचेअर ॲक्सेसीबल टॅक्सींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघानिहाय २५ लोफ्लोअर ईलेक्ट्रीक व्हिलचेअर ॲक्सेसीबल बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४