Maharashtra Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रसह संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. देशात आतापर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. यानंतर उद्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर गृह खात्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. गृह खात्याने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली.
महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी (१३ मे २०२४) रोजी मतदान होणार आहे. यानंतर पाचव्या टप्प्यासाठी मतदान होईल. यामध्ये मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण मतदारसंघाचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी किंवा कोणताही अनूचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांच्या साप्ताहिक आणि सुट्ट्या रद्द करण्यात आल्याची माहिती गृह खात्याने दिली.
नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघाचा समावेश आहे. यानंतर धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण मतदारसंघात २० मे २०२४ रोजी पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले आहे. राज्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल २०२४ रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ- वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी मतदारसंघात मतदान पार पडले. यानंतर तिसऱ्या टप्प्यात ७ मे २०२४ रोजी रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले येथे मतदान झाले. देशात यंदा लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून २०२४ रोजी जाहीर होणार आहे.