Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राज्यात आतापर्यंत दोन टप्प्यात निवडणुका झाल्या. तर, पुढच्या आणि तिसऱ्या टप्प्यात ११ ठिकाणी मतदार होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील मतदारांनी मोठ्या संख्येत मतदान करावे, यासाठी मुंबई मेट्रो खास उपक्रम राबवत आहे. मेट्रो लाइन्स २ ए आणि ७ च्या प्रवाशांना मतदानाच्या दिवशी विशेष १० टक्के सूट मिळणार आहे.
मतदानाच्या दिवशी मुंबईतील नागरिक मतदान करण्यासाठी शहरातील कानाकोपऱ्यातून प्रवास करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर २० मे २०२४ रोजी मुंबई मेट्रोने त्यांच्या प्रवाशांना सवलत देण्याचा निर्णय हाती घेतला. यामुळे नागरिकांना मतदान करण्यासाठी जाताना आणि मतदान करून घरी परतताना तिकीटातून सूट दिली जाणार आहे.
मेट्रो चालकांना त्यांचे नागरी कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि निवडणुकीत मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी महामुंबई मेट्रो पद्धतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग (SVEEP) कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होत आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रासाठी योगदान देण्यासाठी प्रवृत्त करणे आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात ५६.६६ टक्के मतदान झाले. परभणीत ५३.७९ टक्के मतदान झाले. तर, नांदेडमध्ये ५२.४७ टक्के, अकोल्यात ५२.४९ टक्के, यवतमाळ वाशिममध्ये ५४.०४ टक्के, अमरावतीत ५४.५०.७६ टक्के, हिंगोलीत ५२.०३ टक्के आणि बुलडाण्यात ५१.२४ टक्के मतदान झाले. तर, पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर या पाच जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान झाले. या जागांवर एकूण ६३.७० टक्के मतदान झाले. लोकसभा निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
संबंधित बातम्या