मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lok Sabha Election 2024: व्हॉट्सअ‍ॅपद्वारे निवडणुकीचा प्रचार करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याचे निलंबन

Lok Sabha Election 2024: व्हॉट्सअ‍ॅपद्वारे निवडणुकीचा प्रचार करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याचे निलंबन

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 30, 2024 11:08 PM IST

Govermnent Staffer Suspended for Campaigning LS Polls: लोकसभा निवडणुकीचे प्रचार करताना आढळलेल्या सरकारी कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणे सरकारी कर्मचाऱ्याला महागात पडले आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणे सरकारी कर्मचाऱ्याला महागात पडले आहे.

Lok Sabha Election News: सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नांदेड येथील सरकारी कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. सरकारी कर्मचारी सोशल मीडियाद्वारे लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना आढळल्याने त्याच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, यू.एस धोते असे निलंबित झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याचे नाव आहे.धोते यांनी सरकारी नियमांचे उल्लंघन करत व्हॉट्सॲपद्वारे लोकसभा निवडणुकीशी संबंधित मेसेज शेअर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या मॅसेजच्या माध्यमातून धोते हे लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत असल्याचे समजते. यानंतर नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी धोते यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा नियम, १९६७ नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित केले आहे.

Mumbai News : 'मुंबईतील झोपडपट्टीतील मजूरवर्ग ‘इलेक्टोरल बॉण्ड’ विकत घेऊ शकत नसल्याने त्यांना हटवण्याचा घाट'

नागरी सेवा नियमानुसार, शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्याला प्रत्यक्ष प्रचार करता येत नाही. निवडणुकीत सहभाग घेणारा राजकीय पक्षांशी शासकीय कर्मचाऱ्याने कोणताही संबंध ठेवता येत नाहीत. सरकारी कर्मचाऱ्याला आपल्या वाहनावर कोणत्याही पक्षाचे चिन्ह लावता येत नाही.

देशात येत्या १९ एप्रिल ते १ जूनपर्यंत अशा सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक १९ एप्रिलला होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. पहिला टप्पा १९ एप्रिलला, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे रोजी, चौथा टप्पा १३ मे रोजी, पाचवा टप्पा २० मे रोजी, सहावा टप्पा २५ मे रोजी आणि शेवटचा सातवा टप्पा १ जून रोजी होणार आहे. तर, ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. याशिवाय, महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाच टप्प्यांत निवडणूक पार पडणार आहे.

IPL_Entry_Point