मराठी बातम्या  /  elections  /  Lok Sabha Election 2024 : आता लोकसभेसाठी घरबसल्या करू शकता मतदान, असा करा अर्ज

Lok Sabha Election 2024 : आता लोकसभेसाठी घरबसल्या करू शकता मतदान, असा करा अर्ज

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 29, 2024 04:22 PM IST

Vote From Home : यंदा लोकसभेत ८० वर्षांपेक्षा अधिक आणि दिव्यांग व्यक्तींना घर बसल्या मतदान करण्याचा मुभा देण्यात आली. यासाठी आधी अर्ज करावा लागणार आहे.

Lok sabha election 2024
Lok sabha election 2024

देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून अवघ्या देशाचे लक्ष या निवडणुकांच्या घोषणांकडे लागले आहे. १३ मार्चनंतर लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. यासाठी राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगही तयारीला लागला आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच घरी बसून मतदान करता येणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

श्रीकांत देशपांडे म्हणाले की, यंदा लोकसभेत ८० वर्षांपेक्षा अधिक आणि दिव्यांग व्यक्तींना घर बसल्या मतदान करण्याचा मूभा देण्यात आली. निवडणुकीच्या दृष्टीने तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. निवडणुकीमध्ये काही धोरणात्मक बदल झाले आहेत. पहिल्यांदाच घरी बसून मतदान करता येणार आहे.

घरी बसून मतदानाचा प्रयोग यापूर्वी कसबा पोट निवडणुकीत करण्यात आला होता.  निवडणूक जाहीर झाल्यानंतर वृद्ध व दिव्यांग लोकांना १२ ड फॉर्म घरपोच दिला जाईल. त्यांच्याकडून ऑप्शन देऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला जाईल. मतदान सुरू होण्याअगोदर या लोकांचे मतदान करून घेण्यात येईल. 

कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी हा प्रयत्न आहे. व्हिडीओ रेकॉर्ड करून मतदान करता येणार आहे. ५० टक्के पोलीस स्टेशन वेब कास्टिंगला जोडली जाणार आहेत. याची थेट लिंक निवडणूक आयोगाकडे असणार आहे. 

WhatsApp channel