Viral Video : कोणते स्टेशन आहे, ओळखा पाहू?… मुंबई लोकलच्या 'या' व्हिडिओची जोरदार चर्चा!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video : कोणते स्टेशन आहे, ओळखा पाहू?… मुंबई लोकलच्या 'या' व्हिडिओची जोरदार चर्चा!

Viral Video : कोणते स्टेशन आहे, ओळखा पाहू?… मुंबई लोकलच्या 'या' व्हिडिओची जोरदार चर्चा!

Updated Jan 09, 2024 10:26 AM IST

Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Mumbai Local Trains
Mumbai Local Trains

Mumbai Local News: मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या शहरात काम करण्यासाठी येतात. मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे दिवसेंदिवस लोकलमधील गर्दी वाढताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर एका रेल्वे स्थानकावरील व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसत आहे. हा व्हिडिओ मुंबई लोकल स्थानकावरील आहे. हे स्थानक कोणते आहे, हे आपल्याला ओळखून दाखवायचे आहे.

mumbai.sheher या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. हा व्हायरल व्हिडीओ मुंबईच्या लोकल ट्रेनचा आहे. लोकल ट्रेनचा वेग हळू हळू कमी होताना दिसते. अशातच या धावत्या लोकलमध्येच लोक चढायला सुरुवात करतात. त्यानंतर लोकल थांबते आणि लोकल ट्रेनमध्ये चढण्याची एकच गर्दी पाहायला मिळते. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “कोणते स्टेशन आहे, ओळखा पाहू? लिहिले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत प्रचंड लोकांनी लाईक्स केले आहे. तर, अनेकांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

यापूर्वी १९७० च्या दशकातील मुंबई लोकलचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये प्रवाशी मुंबईकर कशाप्रकारे लोकलला लटकून प्रवास करायचे ते दिसत आहे. नेहमीप्रमाणे खचाखच भरलेली लोकल ट्रेन ५० वर्षापूर्वीही याच अवस्थेत होती, हे पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले.

Uran local train : येत्या शुक्रवारपासून धावणार सीएसएमटी - उरण लोकल

मुंबईतील उपनगरी रेल्वे मार्गाचे सहा मुख्य मार्ग आहेत, ज्यात मध्य मार्ग, हार्बर मार्ग, ट्रान्सहार्बर मार्ग, नेरूळ- उरण मार्ग, पनवेल- दिवा- वसई मार्गांचा समावेश आहे. काही दिवसानंतर सीएमएसटीवरून उरणसाठी लोकल धावणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर