Local Train Update: मुसळधार पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत; मध्य आणि हार्बरसह पश्चिम रेल्वे देखील उशीरा!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Local Train Update: मुसळधार पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत; मध्य आणि हार्बरसह पश्चिम रेल्वे देखील उशीरा!

Local Train Update: मुसळधार पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत; मध्य आणि हार्बरसह पश्चिम रेल्वे देखील उशीरा!

Published Jul 20, 2024 08:07 AM IST

Mumbai Local Train Update: जोरदार पाऊस त्यातच रेल्वे सेवा देखील उशिराने सुरू असल्याने, सकाळीच कामासाठी घराबाहेर पडलेल्या कामगार वर्गाला मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मध्य आणि हार्बरसह पश्चिम रेल्वे देखील उशीरा!
मध्य आणि हार्बरसह पश्चिम रेल्वे देखील उशीरा! (HT)

Mumbai Local Train Update: मुंबईसह वेगवेगळ्या भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे आता काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहेत. मुंबईसह इतर परिसरात पडत असलेल्या जोरदार पावसाचा आता रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. यातच मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू असून, कल्याण डोंबिवलीतील जनजीवन विस्कळीत झाल्याचे समोर येत आहे. मुंबईसहउपनगरात पडत असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे ५ ते १० मिनिटे उशिराने धावत आहेत. तर, हार्बर रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.

जोरदार पाऊस त्यातच रेल्वे सेवा देखील उशिराने सुरू असल्याने, सकाळीच कामासाठी घराबाहेर पडलेल्या कामगार वर्गाला मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या या पावसामुळे मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात सध्या जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळतेय. या भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असून, नेहमीप्रमाणेच सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही तास पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

Weather Update: मुंबईत पावसाचा जोर वाढला; महाराष्ट्रातील ‘या’ २ जिल्ह्यांना रेड तर ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट!

सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात

रात्रीपासून सुरू असलेल्या या संततधारेमुळे मुंबई आणि उपनगरातील काही सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, याचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे. एकीकडे या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक उशिराने धावत असताना, आता साचलेल्या पाण्यामुळे रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, पाऊस असाच कोसळत राहिला तर यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे.

‘लाईफलाईन’ खोळंबली!

पहाटेपासून मुसळधार पाऊस असल्याने मुंबईची लाईफ लाईन अर्थात लोकल ट्रेन सेवा आता खोळंबलेली दिसत आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या लोकल ट्रेन पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत आहेत. तर, हार्बर रेल्वे मार्गावरील ट्रेन देखील पंधरा ते वीस मिनिटाच्या उशिराने धावताना दिसत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रकही कोलमडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचा परिणाम आता नागरिकांवर होत असून, सकाळीच कामावर निघालेल्या कामगार वर्गाला मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर