
Mumbai Local Train News Today : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली लोकल सेवा आज सकाळी पुन्हा विस्कळीत झाली आहे. हार्बर लाईनवर तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. परिणामी सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अनेक रेल्वे १० ते १५ मिनिटांच्या उशीराने धावत असून काही रेल्वे रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर आता रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून तांत्रिक बिघाड दूर करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. दुरुस्ती केल्यानंतर लोकल सेवा सुरळीत केली जाणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी हार्बर लाईनवरून सीएसटीकडे धावणाऱ्या एका लोकल रेल्वेत अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळं रेल्वे थांबवण्यात आली, परिणामी अन्य रेल्वेंचं वेळापत्रक कोलमडलं. याशिवाय हार्बर मार्गावरून धावणाऱ्या अनेक रेल्वे १५ मिनिटांच्या उशीराने धावत असून अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळं आज सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेकांनी कामावर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून तांत्रिक बिघाड दूर करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. दुरुस्ती केल्यानंतर रेल्वेसेवा पुन्हा सुरळीत केली जाणार असल्याची माहिती आहे. हार्बर मार्गावर धावणारी ट्रेन रूळावरच बंद पडल्याने अनेक प्रवासी अडकून पडले आहे.
हार्बर मार्गावर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळं सीएसटीहून पनवेल-वाशीकडे जाणारी रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. तसेच वाशीहून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलही ठप्प झाल्या आहे. त्यामुळं कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना उशीर होत असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाल्याने मुंबईतील लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर आता तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे सेवा रद्द झाल्याने मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
संबंधित बातम्या
