मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Live Blog: चंद्रपूर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

उद्धव ठाकरे

Live Blog: चंद्रपूर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

  • Daily News Update

Tue, 24 May 2022 4:42 PM

नागपुरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात; वाढत्या उष्णतेपासून दिलासा

नागपूर तसेच आजुबाजूच्या जिल्ह्यात बुधवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वारे आल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नागपुरच्या उष्णतामानात खूप वाढ झाली होती. या पावसामुळे वातवरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे .

<p>नागपुरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात</p>
नागपुरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात

Sat, 21 May 2022 4:53 PM

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण: हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला दोषी. २६ मे रोजी होणार शिक्षेची सुनावणी

<p>ओमप्रकाश चौटाला</p>
ओमप्रकाश चौटाला

Sat, 21 May 2022 2:51 PM

चंद्रपूर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत

चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथील अपघातात मरण पावलेल्या ९ जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अजयपूर गावाजवळ शुक्रवारी रात्री पेट्रोलचा टँकर आणि ट्रकची धडक होऊन लागलेल्या आगीत ९ मजुरांचा भाजून मृत्यू झाला होता.

Sat, 21 May 2022 1:30 PM

राज ठाकरे यांनी घेतली डॉक्टर सदानंद मोरे यांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे येथे जेष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. सदानंद मेारे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांची विविध सामाजिक विषयांवर प्रदिर्घ चर्चा झाली.

Sat, 21 May 2022 12:37 PM

काँग्रेसमध्ये गळतीचा नव्हे, गाळपाचा हंगाम आहे; 'सामना'तील टीकेला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचं उत्तर

Sat, 21 May 2022 12:24 PM

हैदराबाद हादरले! आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या तरुणाची हत्या

तेलंगनाची राजधानी हैदराबादमध्ये आणखी एक ऑनर किलिंगची घटना घडली आहे. नीरज पनवर नावाच्या तरुणाने आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. त्याची चौघांनी चाकूने भोसकून हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Sat, 21 May 2022 11:38 AM

लाल महालात लावणीवर नृत्य, तिघांविरोधात गुन्हा दाखल

पुण्यात लाल महालात लावणीवर नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा संताप व्यक्त केला आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Sat, 21 May 2022 11:43 AM

पुण्यात अखिल भारतीय मराठा महासंघाकडून लाल महालाचं शुद्धीकरण

लावणी नृत्याचं चित्रीकरण केल्याबद्दल पुण्यात अखिल भारतीय मराठा महासंघाकडून लाल महालाचं शुद्धीकरण. विना परवानगी चित्रीकरण केल्याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sat, 21 May 2022 10:35 AM

गाडी झाडावर आदळून भीषण अपघात, ७ जणांचा जागीच मृत्यू

कर्नाटकात गाडी झाडावर आदळून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत १० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. धारवाडमध्ये लग्नाला गेलेल्या २१ जणांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास केला जात आहे.

Sat, 21 May 2022 9:10 AM

बिहारमध्ये वेगवेगळ्या भागात वीज कोसळून  ३३ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये वीज पडून वेगवेगळ्या ठिकाणी ३३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Sat, 21 May 2022 7:52 AM

महाराष्ट्रात गेल्या २४ तासात कोरोनाचे ३११ नवे रुग्ण

महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचे ३११ नवे रुग्ण आढळले असून त्यात एकट्या मुंबईतील २३१ रुग्णांचा समावेश आहे. २७० जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या १७६१ जण उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Sat, 21 May 2022 8:17 AM

LPG पाठोपाठ CNG च्या दरात वाढ, जाणून घ्या किती झाली किंमत

पेट्रोल डिझेलचे दर गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहेत. मात्र नुकतीच एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. आता सीएनजीच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. दिल्लीत सीएनजीची किंमत ७५.६१ रुपये प्रति किलोग्रॅम इतकी झाली आहे. तर नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबादमध्ये सीएनजीची किंमत ७८.१७ रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे.

शेअर करा

  • Share on Twitter
  • Share on FaceBook