ज्ञानवापी मशीद सर्व्हेचा अहवाल सादर करण्यासाठी कोर्ट कमिश्नरने मागितला वेळ
ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे काल पूर्ण झाला असून आज न्यायालयात अहवाल सादर करायचा होता. मात्र कोर्ट कमिश्नरकडून अद्याप अहवाल पूर्ण झाला नसल्याचं न्यायालयात सांगण्यात आलं आहे. आता अर्ज दाखल करून पुढची तारीख मागण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
माफिया सरकारला वाचवण्यासाठी पोलिस ठाण्याला आग, सोमय्यांचा आरोप
दापोली पोलिस ठाण्यात १४ मे रोजी आग लागली होती. यावरून किरीट सोमय्या यांनी सूचक असं एक ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे. पोलिस ठाण्यात परबांच्या रिसॉर्टसंदर्भातले पुरावे होते, ते पुरावे सुरक्षित आहेत का? माफिया सरकारला वाचवण्यासाठी पोलिस ठाण्याला आग लावली का? असं त्यांनी म्हटलं आहे. आगीत फाइल्स जळाल्या की जाळण्यात आल्या? असा प्रश्न सोमय्यांनी विचारत या आगीबाबत शंका उपस्थित केली आहे.
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला मारहाण, चूक असेल त्याच्यावर कारवाई - गृहमंत्री
महिलांना मारहाण ही निंदनीय बाब आहे. या प्रकरणात ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मग त्यात राष्ट्रवादी किंवा भाजपचे पदाधिकारी कोणाचीही चूक असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. पुण्यात महागाईविरोधात आंदोलन करत असताना भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. तेव्हा राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता.
ज्ञानवापी मशिद सर्वैचा अहवाल अद्याप तयार नाही, कोर्ट कमिश्नर यांची माहिती
ज्ञानवापी मशिद परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सर्व्हेक्षण कऱण्यात आलं. त्याच अहवाल आज सादर करण्यात येणार होता, मात्र कोर्ट कमिश्नर अजय कुमार मिश्र यांनी अहवाल अजून तयार नसल्याचं सांगितलं आहे. अहवालावर काम सुरु असून सुनावणी सुरु होण्याआधी तो सादर केला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.
ज्ञानवापीत शिवलिंग सापडल्याचा दावा, फोटो आले समोर
वाराणसीत ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून कऱण्यात आल्यानंतर आता काही फोटो समोर आले आहेत. नंदीच्या मूर्तीजवळ असलेल्या विहिरीत १२ फुटांचे शिवलिंग सापडले असून तो भाग आता सील करण्यात आला आहे.
माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांच्या पुत्राच्या मालमत्तेवर सीबीआयचे छापे
देशाचे माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयने छापे टाकले आहेत. मुंबई, दिल्ली, तामिळनाडुतील मालमत्तांवर छापे टाकण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
LIC IPO चे आज लिस्टिंग, गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता
देशातील सर्वात मोठा आयपीओ आज बाजारात येणार आहे. एलआयसीच्या आयपीओचं आज लिस्टिंग होत आहे. पहिल्या दिवशी शेअर्स घसरणार की वधारणार उत्सुकता गुंतवणूकदारांना लागून राहिली आहे.
मध्य प्रदेश : दर्ग्याजवळ हनुमानाची मूर्ती ठेवल्यानं तणाव, नीमचमध्ये कलम १४४ लागू
मध्य प्रदेशातील नीमचमध्ये दोन समाजात हिंसाचाराची घटना घडली. यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. काही लोकांना दर्ग्याजवळ हनुमानाची मूर्ती ठेवली. त्यामुळे दोन समाजात वाद निर्माण झाला. यात दगडफेकीची घटनाही घडली. मुस्लिम पक्षाने आरोप केला की दर्ग्याच्या ठिकाणी मंदिर निर्माण करण्यात आलं आहे.
एक दिवस पुरेल इतकंच पेट्रोल; लंकेच्या पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन
आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेकडे केवळ एक दिवस पुरेल इतकंच पेट्रोल शिल्लक आहे. पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी नागरिकांना आवाहन केलं की, "पुढचे काही महिने आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण काळापैकी असणार आहेत. आपल्याला काही त्याग करण्यासाठी आणि या संकटाचा सामना करण्यासाठी स्वत:ला तयार करायला हवं."
पाकिस्तान : कराचीत बॉम्बस्फोट, एका महिलेचा मृत्यू; १० जखमी
पाकिस्तानमध्ये कराचीत खरदार भागात सोमवारी सायंकाळी बॉम्बस्फोट झाला. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या गाडीला टार्गेट करत बॉम्बस्फोट घडवून आणल्याची माहिती समोर येत आहे.