मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Live Blog: केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या, पुण्यातही गुन्हा दाखल

Live Blog: केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या, पुण्यातही गुन्हा दाखल

  • Live News Updates

Sat, 14 May 2022 6:31 PM

भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हल्ला

शरद पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान पोस्ट केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची विनायक आंबेकर यांना मारहाण

Sat, 14 May 2022 3:01 PM

केतकी चितळे हिच्या विरोधात पुण्यातही गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळं केतकी चितळे चांगलीच अडचणीत आली आहे. ठाणे जिल्ह्यातील कळव्यानंतर आता पुण्यातही केतकीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Sat, 14 May 2022 2:56 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी शिवसेनेची जोरदार तयारी. पुणे, नाशिकहून शेकडो शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना

Sat, 14 May 2022 1:47 PM

नांदेड: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीच्या 'सहकारसूर्य' मुख्यालयाचं उद‌्घाटन.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यांत्रिक पद्धतीचा अवलंब करावा, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. सहकार क्षेत्राचे प्रश्न मांडण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. याबाबतीत नितीन गडकरी यांची भूमिका सहकार्याची असते, असंही पवार म्हणाले.

Sat, 14 May 2022 11:31 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्वीट करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

बारामतीच्या गांधीसाठी नथुराम गोडसे तयार करण्याची वेळ आली आहे, असं वादग्रस्त ट्वीट करणाऱ्या तरुणाला दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. निखिल भामरे असं या तरुणाचं नाव असल्याचं समोर आलं आहे.

Sat, 14 May 2022 11:31 AM

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा या दाम्पत्यानं दिल्लीत केलं हनुमान चालिसा पठण

उद्धव ठाकरे यांचं सरकार हे महाराष्ट्रावरील सर्वात मोठं संकट आहे, अशी टीका करत राणा दाम्पत्यानं राजधानी दिल्लीतील हनुमान मंदिरात केली आरती.

Sat, 14 May 2022 11:31 AM

शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; संजय राऊत यांची केतकी चितळेवर अप्रत्यक्ष टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता शेलक्या शब्दांत टीका केली आहे. ‘हे नशेबाज लोक आहेत. त्यांना वेगळ्या प्रकारची नशा चढली आहे. त्यांच्याकडं दुर्लक्ष करा,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

शेअर करा

  • Share on Twitter
  • Share on FaceBook