Live News Updates 31 March 2023 : ठाण्यात नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा सत्याग्रह
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज, शुक्रवारी ठाणे शहरातील महात्मा गांधी गार्डन येथील गांधी पुतळ्यासमोर सत्याग्रह करण्यात आला. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निषेध करण्यासाठी हा सत्याग्रह करण्यात आला.
Fri, 31 Mar 202317:13 IST
सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्रे राहणार सुरू
औरंगाबाद : ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ होण्यासाठी औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही १ व २ एप्रिल २०२३ रोजी सुरू राहतील.या उपलब्ध सुविधेसह डिजिटल माध्यमातून ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे
Fri, 31 Mar 202313:02 IST
Ramesh Bais : मुंबईतील समुद्राचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर व्हावा; राज्यपाल रमेश बैस यांची सूचना
मुंबईला समुद्र किनारा लाभला असला तरी देखील समुद्राचा जलवाहतुकीसाठी पुरेसा उपयोग झाला नाही. या दृष्टीने माल वाहतूक आणि प्रवाश्यांची वाहतूक या दोन्हीकरिता जल परिवहन सेवा सुरु करण्याबद्दल शक्यतांची तपासणी केली जावी अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केली. राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राज्यातील राष्ट्रीय नौवहन सप्ताह आणि हीरक महोत्सवी राष्ट्रीय नौवहन दिनाचे उद्घाटन राजभवनात झालं. त्यावेळी ते बोलत होते.
Fri, 31 Mar 202310:25 IST
दिल्ली: वजिरपूर परिसरात एका फॅक्टरीमध्ये मोठी आग
दिल्ली: वजिरपूर परिसरात एका फॅक्टरीमध्ये मोठी आग. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी दाखल.
Fri, 31 Mar 20237:45 IST
Kadus : कडूसला गावाला ‘गोबरधन’ प्रकल्प ठरणार वरदान
खेड तालुक्यातील कडूस येथे राज्यातील पहिला ‘गोबरधन’ प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ग्रामपंचायतीला वीज प्राप्त होणार असून वर्षाला विजेसाठी होणाऱ्या ८ ते १० लाख रुपयांची बचत होणार आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद टोणपे, माजी जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, सरपंच शहनाज तुरूक, ग्रामसेवक बाळासाहेब माने आदी उपस्थित होते.
Fri, 31 Mar 20236:48 IST
Jayant Patil : मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचं पाप शिंदे - फडणवीस सरकारनं केलंय - जयंत पाटील
Jayant Patil : विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारनं मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर, आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकार करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. महाविकास आघाडी सरकारनं गेल्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयांच्या कल्याण योजनांसाठी केलेल्या तरतुदीमध्ये सध्याच्या सरकारनं मोठी कपात केली आहे. याचा फटका मागासवर्गीयांच्या अनेक योजनांना बसला आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
Fri, 31 Mar 20235:29 IST
Indapur Crime : इंदापूर पोलिसांनी पकडला १८ लाखांचा गुटखा; दोघे अटकेत
इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकलूज-इंदापूर महामार्गावर बंदी असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत १८.८ लाख रुपयांचा गुटखा २४.८ लाख रुपयांचा माल जप्त केला. जप्तीची जबाबदारी पुणे ग्रामीण पोलिसांवर होती.
Fri, 31 Mar 20235:28 IST
Pune : पी डी इ ए शाळेचीच्या येत्या २०२३ -२४ च्या शुल्कासाठी विद्यार्थ्यांचे निकाल ठेवले राखून पालकांमध्ये संताप
जिल्हा शिंक्षण मंडळाच्या खराडी येथील पीडिईए इंग्लिश मिडीयम शाळेने २०२३ -२४ चे शैक्षणिक वर्ष सुरु होण्याआधीच ६० टक्के शुल्क भरण्याची सक्ती केली आहे. न देणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्याचा प्रकार सुरु असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
Fri, 31 Mar 20231:13 IST
Mumbai News : राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी दहा सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार
लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. अंगणवाड्यांचा विकास होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. आज राज्यातील विविध दहा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ७५० अंगणवाड्या दत्तक देत आहोत. अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत ऑक्टोबर २०२२ पासून विविध सामाजिक संस्थांनी आतापर्यंत ३६६८ अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत त्यामुळे राज्यात एकूण ४४१८ अंगणवाड्यांचा विकास होण्यास सामाजिक संस्थाचे सहकार्य मिळत असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
Fri, 31 Mar 20231:12 IST
Crime : श्रद्धा वालकर प्रकरणात आज साकेत कोर्टात सुनावणी
श्रद्धा वालकर प्रकरणात आज साकेत कोर्टात सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने आफताबला ताकिद दिली होती कि पुन्हा वकिल बदलला तर बाजू मांडायला वेळ दिला जाणार नाही.
Fri, 31 Mar 20231:11 IST
CBI : चंदा कोचर यांच्या विरोधातील सीबीआयच्या रिमांड अॅप्लिकेशनवर सुनावणी
सीबीआय कोर्टात चंदा कोचर विरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या रिमांड अप्लिकेशनवर आज सुनावणी होणार आहे. कोर्टानं जर सीबीआयची विनंती मान्य केली तर चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
Fri, 31 Mar 20231:11 IST
Court News : कलिना लायब्ररी लाच प्रकरणी याचिकेवर सुनावणी
पीएमएलए कोर्टात कलिना लायब्ररी कामात लाच घेतल्याचा आरोपांच प्रकरण न्यायालयात असून त्यावर आज सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळांवर दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.
Fri, 31 Mar 20231:10 IST
Javed Akhtar : जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर सुनावणी
आरएसएसची तुलना तालीबानशी करणाऱ्या गीतकार जावेद अख्तर यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावरील वादावर मुलुंड कोर्टात सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयानं जावेद अख्तर यांना याप्रकरणी दिलासा द्यायला नकार दिल्यानं, आज जावेद अख्तर कोर्टात हजर होतात का हे पाहणं महत्वाचं आहे.
Fri, 31 Mar 20231:10 IST
Mumbai : अनिल जयसिंघानी यांच्या अटकेच्या याचिकेवर सुनावणी
अमृता फडणवीस प्रकरणात अटक आरोपी अनिल जयसिंघानीनं अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे.
Fri, 31 Mar 20231:09 IST
IPL New Season : आज असून IPL च्या नव्या सीझनचा धमाका
आजपासून आयपीएलच्या नव्या सीजनला सुरूवात होणार आहे. गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल २०२३ चा पहिला सामना रंगणार आहे. शुक्रवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.