मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Live News Updates 3 February 2023 : मराठी साहित्य संमेलनात विदर्भवाद्यांचा गोंधळ

Live Blog (HT)

Live News Updates 3 February 2023 : मराठी साहित्य संमेलनात विदर्भवाद्यांचा गोंधळ

Akhil Bharatiya Marathi Sahitya sammelan : वर्धा येथे ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

Fri, 03 Feb 202310:38 IST

आठवड्याच्या शेवटच्या सत्रात निर्देशांकात ९०९ अंशांची उसळी 

 शुक्रवारी शेअर बाजारात बाउन्स बॅक पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी १ टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. शुक्रवारच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, इन्फ्रा समभागांमध्ये खरेदी दिसून आली, तर एनर्जी, फार्मा आणि रियल्टी समभागांमध्ये दबाव दिसून आला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स ९०९.६४ अंकांच्या म्हणजेच १.५२ टक्क्यांच्या वाढीसह ६०,८४१.८८ वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी २२३.३० अंकांच्या म्हणजेच १.३८ टक्क्यांच्या वाढीसह १७,८५४.०५ च्या पातळीवर बंद झाला.

इंडसइंड बँक, टायटन कंपनी, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, एसबीआय आणि लार्सन अँड टुब्रो हे शुक्रवारच्या व्यवहारात निफ्टीमध्ये आघाडीवर होते. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, डिव्हिस लॅब्स आणि हिंदाल्को इंडस्ट्रीज हे सर्वाधिक घसरले.

Fri, 03 Feb 20239:05 IST

Marathi Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलनात विदर्भवाद्यांचा गोंधळ

अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू असताना विदर्भ राज्य समितीच्या कार्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी काही कागद व्यासपीठाच्या दिशेनं भिरकावले. पोलिसांनी वेळीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना साहित्य संमेलनाच्या मंडपाबाहेर नेले. या प्रकारामुळं काही वेळ गोंधळ उडाला होता.

Fri, 03 Feb 20234:05 IST

सेन्सेक्समध्ये वाढ, निफ्टीही वधारला 

आशियाई बाजारपेठेतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्सची सुरुवात आज चांगली झाली. सेन्सेक्सने सुरुवातीला ३७५ अंशांची उसळी घेत अंदाजे ६०२०० च्या अंश पातळीला खुला झाला. निफ्टीही १७७०० अंशांच्या पातळीवर खुला झाला. त्यात अंदाजे ६० अंशांची वाढ झाली. आज अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्सला पुन्हा एकदा लोअर सर्किट लागले आहे. 

Fri, 03 Feb 20232:49 IST

Pune : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ५७ वाहनांचा जाहीर ई-लिलाव

पुणे : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या ५७ वाहनांचा जाहीर ई-लिलाव प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे, आळंदी रोड कार्यालय व वाघेश्वर वाहनतळाच्या आवारात कार्यालयीन वेळेत वाहने पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये टुरिस्ट टॅक्सी, बस, हलकी परिवहन वाहने, रिक्षा या वाहनांचा समावेश आहे. लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहणार आहे.

Fri, 03 Feb 20231:54 IST

चला जाणूया नदीला’ अभियानासाठी गठीत जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न

पुणे  : ‘चला जाणूया नदीला’ अभियानासाठी गठीत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासन तसेच नागरी संस्थेच्या समन्वयातून प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन खराडे यांनी यावेळी केले.

Fri, 03 Feb 20231:53 IST

Pune : मतदानाची टक्केवारी वाढावी यादृष्टीने जनजागृतीचे उपक्रम राबवावेत- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे  : पोट निवडणूक होणाऱ्या २१५- कसबा विधानसभा मतदार संघ आणि २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व संबंधित समन्वयक अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढेल यासाठी जनजागृतीचे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्याच्या सूचना डॉ. देशमुख यांनी दिल्या.

Fri, 03 Feb 20230:56 IST

pune bypoll : पुण्यातील पोटनिवडणुकी संदर्भात आज महावीकस आघाडीची बैठक

पुणे  :  कसबा आणि चिंचवड मतदार संघाचा उमेदवार निश्चीत करण्यासाठी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. तर पुण्यात सकाळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.  

Fri, 03 Feb 20230:55 IST

MPSC : नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन

पुणे : नवीन वर्णनात्मक अभ्यास २०२३ पासूनच लागू करावा या मागणीसाठी सकाळी १० वाजता MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन करण्यात येणार आहे. आता MPSC च्या विद्यार्थ्यांकडून UPSC च्या धर्तीवर परिक्षा घेण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. आज सकाळी १० वाजता पुण्यातील अलका चौकात त्यासाठी विद्यार्थी एकत्र येणार आहेत.

Fri, 03 Feb 20230:53 IST

96 Sahity sammelan in Wardha : वर्धा येथे ९६ व्या मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

96 Sahity sammelan in Wardha : वर्धा येथे ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित राहणार आहेत. सकाळी ८ वाजता ग्रंथ दिंडीला सुरुवात होणार असून १० वाजता संमेलन स्थळी ध्वजारोहण होणार आहे. तर १०.३० वाजता उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. उद्घाटन सोहळ्यात संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.