Pune university : पुणे विद्यापीठाच्या ३० जानेवारीच्या परीक्षा आता ५ फेब्रुवारीला
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ३० जानेवारीला होणाऱ्या परीक्षा ५ फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यांसाठी लागू असेल.
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी पुणे आणि मावळ दौऱ्यावर
पुणे, पिंपरी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी पुणे आणि मावळ दौऱ्यावर आहे. संध्याकाळी ५.४५ वाजता १६ व्या भीमथडी जत्रा आणि प्रदर्शनाला तर संध्याकाळी ७ वाजता भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराज मंदिरातील माघ दशमीच्या सोहळ्याला लावणार उपस्थिती.
Ajit Pawar : अजित पवार यांचा आज सातारा दौरा
सातारा : विरोधी पक्षनेते अजित पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. सकाळी ९ वाजता अजित दादांच्या हस्ते वडूजमधील स्पंधन हॉस्पिटलचे उद्घाटन होणार आहे.
Cricket : आयसीसीच्या अंडर १९ महिला टी २० वल्डकपची आज फायनल
दक्षिण आफ्रिका- भारत वि. इग्लंड दरम्यान आज आयसीसीच्या अंडर १९ महिला टी२० वल्डकपची आज फायनल असून ती संध्याकाळी ५.१५ वाजता सुरू होणार आहे.
CM Eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. दुपारी २ वाजता निरंकारी संत समागम कार्यक्रमास लावणार उपस्थिती
Beating retreat ceremony : दिल्लीच्या विजय चौकात आज बीटिंग रिट्रीट सोहळा; प्रजासत्ताक दिंन सोहळ्याचा होणार समारोप
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत दिल्लीच्या विजय चौकात आज बीटिंग रिट्रीट सोहळा होणार आहे. यंदाच्या बीटिंग रिट्रीट सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यात शास्त्रीय रागांवर आधारीत भारतीय धुन वापरल्या जाणार आहेत. तर या सोहळ्यात भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन शोचाही समावेश असणार आहे.